...हेच खरे शिवरायांचे वारसदार

By Admin | Published: February 25, 2017 02:35 AM2017-02-25T02:35:43+5:302017-02-25T02:35:43+5:30

सण-समारंभांसाठी होणारा खर्च टाळून गरजूंना मदतीचा हात देण्याकरिता मोजकेच लोक पुढाकार घेतात. तावरे दाम्पत्याने संसार सुरू करतानाच रायगड

This is the true successor of Shivrajaya | ...हेच खरे शिवरायांचे वारसदार

...हेच खरे शिवरायांचे वारसदार

googlenewsNext

पुणे : सण-समारंभांसाठी होणारा खर्च टाळून गरजूंना मदतीचा हात देण्याकरिता मोजकेच लोक पुढाकार घेतात. तावरे दाम्पत्याने संसार सुरू करतानाच रायगड किल्ले परिसरातील मुलांचे भवितव्य घडविण्यासाठी उचललेले पाऊल युवकांना आदर्श ठरेल असे आहे. आम्ही शिवछत्रपतींच्या रक्ताचे वारस असलो, तरी अशा कार्यांमधून शिवरायांचे नवे वारस तयार होत आहेत, असे प्रतिपादन खासदार छत्रपती संभाजीमहाराज यांनी केले.
निरंजन सेवाभावी संस्थेतर्फे रायगड परिसरातील ५० विद्यार्थ्यांचे पालकत्व स्वीकारले आहे. त्या उपक्रमाला हातभार लावत संस्थेचे विराज तावरे आणि केतकी तावरे यांनी लग्न साध्या पद्धतीने केले आणि रायगड परिसरातील गरजू मुलांच्या शिक्षणाकरिता आर्थिक मदत दिली. विनायक निम्हण, विकास पासलकर, उमेशचंद्र मोरे, जयेश कासट, सचिन मिणीयार उपस्थित होते.

Web Title: This is the true successor of Shivrajaya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.