सत्ताबदलानंतर नगराध्यक्ष पुन्हा जनतेतून निवडला जाणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2022 08:06 PM2022-07-08T20:06:03+5:302022-07-08T20:20:06+5:30

निवडणूकीची प्रक्रीया 20 जुलैपासून सुरु...

trumpet of municipal elections in the state sounded Voting will take place on August 18 | सत्ताबदलानंतर नगराध्यक्ष पुन्हा जनतेतून निवडला जाणार?

सत्ताबदलानंतर नगराध्यक्ष पुन्हा जनतेतून निवडला जाणार?

Next

बारामती : राज्यातील सत्तांतरानंतर आता नगरपालिकांच्या निवडणुकांचा बिगुल वाजला आहे. राज्यातील पर्जन्यमान कमी असलेल्या 17 जिल्ह्यातील 92 नगरपालिका व चार नगरपंचायतींच्या निवडणुकींचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने आज जाहीर केला. 18 ऑगस्ट रोजी मतदान होणार असून या निवडणूकीची प्रक्रीया 20 जुलैपासून सुरु होणार आहे.

निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार, 20 जुलै रोजी जिल्हाधिकारी निवडणूक कार्यक्रम जाहीर करणार असून लगेच 22 ते 28 जुलैपर्यंत राज्य निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या संकेतस्थळावर नामनिर्देशनपत्र भरायची आहेत. 

छाननी व वैध नामनिर्देशन पत्र असलेल्या उमेदवारांची यादी 29 जुलै रोजी जाहीर केली जाणार असून 4 ऑगस्टपर्यंत अर्ज माघारी घेता येणार आहेत. उमेदवारी मागे घेण्यासाठीच्या शेवटच्या दिवसानंतरच्या लगतच्या दिवशी अंतिम यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. जेथे आवश्यकता भासेल त्या ठिकाणी 18 ऑगस्ट रोजी मतदान घेतले जाणार आहे. लगेच दुस-या दिवशी म्हणजे 19 ऑगस्ट रोजी मतमोजणी करुन निकाल जाहिर केले जाणार आहेत. 

यंदा अर्ज माघारी घेणे व प्रत्यक्ष मतदान यात 14 दिवसांचा कालावधी असून प्रचारासाठी दोन आठवड्यांचा कालावधी उमेदवारांना मिळणार आहे. यंदा प्रथमच संकेतस्थळावर उमेदवारी अर्ज दाखल करण्याबाबचा उल्लेख निवडणूक आयोगाने केला आहे. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार अंतिम मतदार याद्यांची निश्चिती झालेली आहे. त्या मतदार याद्यानुसारच आता मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. 

सत्ताबदलानंतर नगराध्यक्ष जनतेतून निवडावा अशी मागणी माजी मंत्री चंद्रकांत बावनकुळे यांनी केली आहे. राज्य शासन या बाबत अनुकुल भूमिका घेण्याची शक्यता आहे. नगरपालिकांच्या निवडणकांचा बिगुल वाजल्याने सर्वपक्षीय  नेत्यांच्या शहरातील राजकीय हालचालींना वेग येणार आहे.

Web Title: trumpet of municipal elections in the state sounded Voting will take place on August 18

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.