प्रात्यक्षिकासाठी रबरी लिंग दिलं असेल तर काय चुकलं?- तृप्ती देसाई
By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2022 11:15 AM2022-03-21T11:15:10+5:302022-03-21T11:25:13+5:30
आशा वर्कर्स पुढे व्हा आणि कुटुंबनियोजनाच्या कामाला लागण्याचा सल्लाही त्यांनी दिला...
पुणे: सार्वजनिक आरोग्य विभागाने कुटुंब नियोजन किटमध्ये ग्रामीण भागांमध्ये प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी जर रबरी लिंग दिले असेल तर चुकीचे काहीच नाही, आशा वर्कर्सनेसुद्धा संकुचित विचार बाजूला ठेवून कुटुंबनियोजन करण्यासाठी ग्रामीण भागामध्ये पुढाकार घेऊन अशा पद्धतीचे प्रात्यक्षिक दाखवण्याची आता गरज निर्माण झाली आहे, असं मत भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई (trupti desai) यांनी मांडले.
"संकुचित विचार सोडा अन् कुटुंबनियोजनाच्या कामाला लागा",
— Lokmat (@lokmat) March 21, 2022
पाहा तृप्ती देसाई काय म्हणाल्या...#truptidesai#Punepic.twitter.com/6RUR8AVYBx
पुढे बोलताना तृप्ती देसाई म्हणाल्या, आम्ही हे कसे दाखवू , ग्रामीण भागातील महिला काय म्हणतील, असा जर आपण संकुचित विचार आता एकविसाव्या शतकात करत बसलो तर कुटुंबनियोजनाच्या गप्पा हवेतच राहतील. कुटुंब नियोजनाच्या या किटचे भूमाता ब्रिगेडच्या वतीने आम्ही स्वागतच करतो असंही देसाई यावेळी म्हणाल्या. आशा वर्कर्स पुढे व्हा आणि कुटुंबनियोजनाच्या कामाला लागण्याचा सल्लाही त्यांनी दिला.