स्वच्छता कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांच्या मदतीकरिता ट्रस्ट उभारणार : चंद्रकांत पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2021 04:09 AM2021-01-04T04:09:32+5:302021-01-04T04:09:32+5:30
पुणे : आपण साखर झोपेत असताना स्वच्छतासेवक संपूर्ण परिसर स्वच्छ करून जातात, पण त्यांना सन्मानाची वागणूक मिळत नाही़ ...
पुणे : आपण साखर झोपेत असताना स्वच्छतासेवक संपूर्ण परिसर स्वच्छ करून जातात, पण त्यांना सन्मानाची वागणूक मिळत नाही़ समाजाचा स्वच्छतासेवकांप्रती असणारा दृष्टिकोन बदलण्यासाठी प्रयत्न करण्याबरोबरच, स्वच्छता कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांच्या मदतीकरिता कायमस्वरूपी ट्रस्ट उभारणार असल्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांत पाटील यांनी सांगितले़
क्रिएटिव्ह फाउंडेशनच्या माध्यमातून प्रभाग १३ मधील ५ आरोग्य कोठ्यांतर्गत स्वच्छता कर्मचा-यांकरिता आयोजित केलेल्या ‘माझा भाग स्वच्छ भाग’ या स्पर्धेचा बक्षीस वितरण कार्यक्रम नुकताच पाटील यांच्या हस्ते झाला़,त्यावेळी ते बोलत होते़ फशनचे अध्यक्ष संदीप खर्डेकर, नगरसेविका मंजूश्री खर्डेकर, माधुरी सहस्रबुद्धे, नगरसेवक दीपक पोटे, प्रसन्न पटवर्धन, वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयाचे सहायक आयुक्त संतोष वारुळे उपस्थित होते़
पाटील म्हणाले, स्वच्छतासेवक सर्वांना हवे असतात़ आपण साखर झोपेत असताना ते संपूर्ण परिसर स्वच्छ करून जातात पण त्यांना सन्मानाची वागणूक मिळत नाही़ येवढेच काय तर आपल्यासाठी स्वच्छतेसारखे मोलाचे कार्य करणा-या सेवकांप्रती आदर व्यक्त केला पाहिजे़
पुणे ही सर्वात स्वच्छ शहर व्हावे यासाठी ही स्पर्धा आयोजित केली असल्याचे संयोजक संदीप खर्डेकर यांनी सांगितले़
--------
फोटो मेल केला आहे़