भरोसा सेलच्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 04:10 AM2021-04-24T04:10:32+5:302021-04-24T04:10:32+5:30
महिला रुग्णांच्या सुरक्षेची घेतली माहिती महिला रुग्णांच्या सुरक्षेची घेतली माहिती बारामती : बारामती व दौंड उपविभागाअंतर्गत असणाऱ्या १३ ...
महिला रुग्णांच्या
सुरक्षेची घेतली माहिती
महिला रुग्णांच्या
सुरक्षेची घेतली माहिती
बारामती : बारामती व दौंड उपविभागाअंतर्गत असणाऱ्या १३ कोविड सेंटरला पुणे ग्रामीण भरोसा सेलच्या पथकाने गुरुवारी (दि. २२) भेट देऊन पहाणी केली. या वेळी कोविड केअर सेंटरमध्ये दाखल असणाऱ्या महिला रुग्णांच्या सुरक्षेचा पथकाने आढावा घेतला, अशी माहिती पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी दिली.
या पथकामध्ये पोलीस कर्मचारी एम. एस. देशमुख, पी. एस. गुंड, डी. पी. वीरकर यांनी सहभाग घेतला होता. सार्वजनिक आरोग्य विभागाने, कोविड केअर सेंटरमध्ये महिलांच्या सुरक्षिततेबाबत मार्गदर्शक सूचनांनुसार उपाययोजनांची पहाणी केली. यामध्ये महिला डॉक्टर व कर्मचारी, ३५ सीसीटीव्ही कॅमेरा, महिला विलगीकरण कक्ष, महिला सुरक्षारक्षक, महिला सफाई कर्मचारी या संदर्भात पाहणी केली. ज्या कोविड सेंटरमध्ये या उपाययोजना निदर्शनास आल्या नाहीत त्या ठिकाणी लवकरात लवकर पूर्तता करण्याच्या सूचना दिल्या. तसेच कोविड सेंटरमध्ये पोलीस मदत केंद्र दूरध्वनी क्रमांक दर्शनी भागात लावण्याच्या सूचना देण्यात आल्या. कोणत्याही प्रकारची महिलांची तक्रार असेल तर कळवण्यास सांगितले. महिला रुग्णांची भेट घेऊन चर्चा केली, व त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यांना धीर दिला व लवकरात लवकर सर्व बरे होणार, अशा सदिच्छा भरोसा सेलच्या पथकाने दिल्या. या मार्गदर्शक सूचनांची एक एक प्रत प्रत्येक शासकीय कोविड केअर सेंटर प्रमुखास माहितीस्तव दिली आहे.
बारामती व दौंड उपविभागातील कोविड केअर सेंटरमध्ये जाऊन पुणे ग्रामीण भरोसा सेलच्या पथकाने महिला रुग्णांची विचारपूस केली. तसेच सुरक्षेबाबत माहिती घेतली.
२३०४२०२१-बारामती-१५