Disha Salian Death| चंद्रकांत पाटलांची भविष्यवाणी, 'दिशा सालियानच्या मृत्यूचे सत्य सात मार्चनंतर बाहेर येईल'

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2022 03:51 PM2022-02-22T15:51:53+5:302022-02-22T16:04:32+5:30

'सात मार्चनंतर सगळे पुरावे बाहेर येतील...'

truth about disha salian death will come out after march 7 said chandrakan patil | Disha Salian Death| चंद्रकांत पाटलांची भविष्यवाणी, 'दिशा सालियानच्या मृत्यूचे सत्य सात मार्चनंतर बाहेर येईल'

Disha Salian Death| चंद्रकांत पाटलांची भविष्यवाणी, 'दिशा सालियानच्या मृत्यूचे सत्य सात मार्चनंतर बाहेर येईल'

googlenewsNext

पुणे: दिशा सालियानच्या (disha salian death) मृत्यूबाबत नेमके काय झाले हे सत्य सात मार्चनंतर बाहेर येईल. यामध्ये कोण गुंतले आहे आणि कोण तुरुंगात जाणार हे स्पष्ट होईल, अशी आणखी एक भविष्यवाणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी (chandrakant patil) केलीय. यापूर्वी राज्यात १० मार्चपर्यंत सत्ताबदल होईल असंही काही दिवसांपूर्वी पाटलांनी सांगितले होते. मंगळवारी कोल्हापूर येथे पत्रकारांशी बोलताना पाटलांनी सांगितले.

दिशा सालियानच्या मृत्यूचे राजकारण होत असल्याचा आरोप एका पत्रकाराने निदर्शनाला आणला असता ते म्हणाले की, याबाबतीत काहीही राजकारण होत नाही. सात मार्चनंतर सगळे पुरावे बाहेर येतील, दूध का दूध – पानी का पानी होईल, कोण गुंतले आहे आणि कोणाला तुरुंगात जावे लागेल हे स्पष्ट होईल. सध्या त्यामुळेच उसने अवसान आणून शिवराळ भाषा वापरणे चालू आहे. दिवा विझण्यापूर्वी फडफडतो तसा हा प्रकार आहे.

चंद्रकांत पाटलांनी सांगितले की, महाविकास आघाडी सरकारचे नेते रांगेत आहेत. काही जात्यात गेले तर काही सुपात आहेत. कोठड्या तयार आहेत. उत्तर प्रदेशात सात मार्च रोजी शेवटचे मतदान झाले की, बहुधा कारवाई सुरू होईल. त्यातून पळता भुई थोडी होईल व त्यातून हे सरकार पडेल, असे आपले विश्लेषण आहे. असा अंदाज सामान्य माणूसही बांधू शकतो.

पुढे बोलताना पाटील म्हणाले की, महाविकास आघाडी पूर्णपणे शेतकरीविरोधी आहे. उसाचे एफआरपीचे पैसे दोन तुकड्यात देण्याचा या सरकारचा निर्णय ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान करणारा आहे. यामुळे शेतकरी ऊसशेती सोडून देतील असा धोका आहे. भारतीय जनता पार्टी या निर्णयाविरोधात टोकाचा संघर्ष करेल.

Web Title: truth about disha salian death will come out after march 7 said chandrakan patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.