राजकीय व्यक्तींच्या फोन टॅपिंगचे सत्य चौकशीत बाहेर येईल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:09 AM2021-07-10T04:09:53+5:302021-07-10T04:09:53+5:30
पुणे: राज्यात सध्या गाजत असलेल्या फोन टॅपिंगमध्ये वेगवेगळ्या व्यक्तींची नावे वापरून तिसऱ्याच पण राजकीय व्यक्तीचे फोन टॅपिंग करण्यात आल्याच्या ...
पुणे: राज्यात सध्या गाजत असलेल्या फोन टॅपिंगमध्ये वेगवेगळ्या व्यक्तींची नावे वापरून तिसऱ्याच पण राजकीय व्यक्तीचे फोन टॅपिंग करण्यात आल्याच्या तक्रारींमध्ये तथ्य आहे. अशा पद्धतीने फोन टॅपिंग करणे नियमात आणि घटनेच्या चौकटीत बसत नसून ते पूर्णपणे चुकीचे आहे. चौकशीमध्ये सर्व समोर येईल असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
जिल्ह्यातील कोरोना आढावा आणि जिल्ह्यातील खासदार आमदार लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीनंतर अजित पवार पत्रकारांशी बोलत होते. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी फोन टॅपिंग संदर्भात केलेल्या तक्रारीबद्दल विचारले असता, पवार म्हणाले, याप्रकरणी चौकशी नेमली आहे, पटोले यांनी केलेल्या तक्रारी टॅपिंगसाठी नावे आणि परवानगी घेतलेल्या व्यक्तींच्या ऐवजी तिसऱ्याच व्यक्तीचे फोन टॅप करण्यात आले, हे सर्वस्वी चुकीचे आहे. पटोले यांच्या तक्रारीत तथ्य असून राजकीय स्वार्थासाठी लोकप्रतिनिधींची नावे बदलून हे करण्यात आले. चौकशीमध्ये सत्य समोर येईल, असे पवार म्हणाले.
--------
ऑनलाईन शाळांच्या फी बाबत लवकरच निर्णय
कोरोना महामारीमुळे शाळांमध्ये सध्या ऑनलाईन शिक्षण दिले जात आहे. त्यामुळे पालकांकडून शाळेची फी कमी करण्याची मागणी होत आहे. या प्रश्नावर विचारले असता पवार म्हणाले, पालकांकडून माझ्याकडे निवेदन आली आहेत. यासंदर्भात सोमवारी मंत्रालयात शिक्षणमत्री तसेच अतिरिक्त मुख्य सचिव यांची बैठक होईल, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली जाईल. शाळांच्या फी बाबत मध्यम मार्ग काढू.
------