पुणेकरांनो...इथली इडली भन्नाट !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2018 03:30 PM2018-03-30T15:30:23+5:302018-03-30T15:30:23+5:30

गरम, हलकी, पांढरीशुभ्र, मऊ हे वर्णन आहे इडलीचे...दक्षिण भारतातील पदार्थ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इडलीसाठी पुण्यातली काही ठिकाणेही तितकीच प्रसिद्ध आहेत. वर्ल्ड इडली डे निमित्त हा विशेष वृत्तांत 

try idli from these places in pune | पुणेकरांनो...इथली इडली भन्नाट !

पुणेकरांनो...इथली इडली भन्नाट !

Next

पुणे : गरमागरम इडली त्यावर चवदार सांबार आणि सोबत ओल्या नारळाची चटणी अहाहा... ! या पदार्थांचे नुसते नाव जरी घेतले तरी जिभेवर दक्षिण भारतीय पदार्थ रुंजी घालायला लागतात.पुण्यातही काही ठिकाणे इडलीसाठी प्रसिद्ध असून खवय्ये पुणेकर तिथे आवर्जून जात असतात. 

१)वैशाली आणि रुपाली :फर्ग्युसन रस्त्यावर असणाऱ्या या दोनही ठिकाणचे दक्षिण भारतीय पदार्थ प्रसिद्ध आहेत. अगदी या हॉटेलच्या बाहेरून गेल्यावरही सुगंध दरवळत असतो. अनेक सेलिब्रिटीही इथे हजेरी लावताना दिसतात. 

२)वाडेश्वर :

पुणेकरांसाठी हे हॉटेल अजिबात नवीन नसलं तरी नातू गणपतीजवळ वाडेश्वरच्या पहिल्या शाखेत मिळणाऱ्या इडलीची चव न्यारीच आहे. सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत सुरु असणाऱ्या या वाडेश्वरच्या शाखेत इडली, डोसा आणि उत्तप्पा हे तीनच पदार्थ मिळतात. 

३)इडोज:

इडो म्हणजे अर्थात इडली आणि डोसा यांचे नाव एकत्र करून इडोज नाव ठेवण्यात आले आहे. एमआयटी कॉलेज रस्त्यावर दुर्गा कॅफेच्या बाजूला असलेल्या या हॉटेलमध्ये इडली, डोसा, उत्तप्पा यात विविध प्रकार मिळतात. सुरु झाल्यापासून इथल्या पदार्थांची चव कायम असल्याची पावती नियमित येणारे ग्राहक देतात. 

४)अण्णा इडली :

बाणेर रस्त्यावर असलेले अण्णा इडली हॉटेलही अनेकांचे विशेष लाडके आहेत. तिथे अत्यंत हलकी, चवदार आणि मूळ दाक्षिणात्य चवीची इडली मिळते. तिथलं सांबारही चाखून बघण्यासारखच आहे. 

५)इडलीवाला :

हे कोणतंही हॉटेल नाही तर व्यक्ती आहे. दररोज सुमारे १००० ते ८०० इडल्या आणि चटणी प्रत्येक सोसायट्यांमध्ये जाऊन विकणाऱ्या इडलीवाल्यांची संख्या पुण्यात प्रचंड आहे. भल्या पहाटे सुरु होणारी ही इड्लीविक्री दुपारी १२ पर्यंत सर्व इडल्या संपवूनच थांबते. या इडल्यांना घरगुती स्तरावर प्रचंड मागणी आहे. 

 

Web Title: try idli from these places in pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.