स्मार्ट सिटीसाठी प्रयत्न

By admin | Published: November 30, 2014 12:29 AM2014-11-30T00:29:26+5:302014-11-30T00:29:26+5:30

केंद्र शासनाच्या ‘स्मार्ट सिटी’ योजनेत समावेश व्हावा यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून प्रयत्न सुरू असल्याची माहिती खासदार अनिल शिरोळे यांनी शनिवारी दिली.

Try for smart city | स्मार्ट सिटीसाठी प्रयत्न

स्मार्ट सिटीसाठी प्रयत्न

Next
पुणो : केंद्र शासनाच्या  ‘स्मार्ट सिटी’ योजनेत समावेश व्हावा यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून प्रयत्न सुरू असल्याची माहिती खासदार अनिल शिरोळे यांनी शनिवारी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील शंभर शहरांचा समावेश स्मार्ट सिटीमध्ये करण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेची माहिती व्हावी, या उद्देशाने सिटी कॉपोर्रेशनच्या  या विषयीच्या  परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी ते बोलत होते. आमदार माधुरी मिसाळ, प्रा. मेधा कुलकर्णी, महापौर दत्तात्रेय धनकवडे, उपमहापौर आबा बागूल यांच्यासह विविध अधिकारी याप्रसंगी उपस्थित होते.  
    खासदार शिरोळे म्हणाले, की विकासासाठी राजकारण बाजूला ठेवण्याची गरज असून, चांगले आणि उत्तम शहर करण्यासाठी इच्छाशक्ती असल्यास त्यात निश्चितपणो यश येईल. या योजनेत सहभागी होण्यासाठी चांगले नियोजन करण्याची गरज आहे. या योजनेत पुण्याचा समावेश व्हावा यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी वारंवार चर्चा करण्यात आली असून, यात समावेश होण्यासाठी पुणो शहरास सुमारे 44  शहरांशी स्पर्धा करावी लागणार आहे. 
 सिटी कॉपोर्रेशनचे व्यवस्थापकीय संचालक अनिरुद्ध देशपांडे यांनी या योजनेचे सादरीकरण केले. (प्रतिनिधी)
 
केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी योजनेत सहभागी होण्याची संधी मिळाल्यास शहराचा कायापालट होणार आहे. त्यामुळे या योजनेत सहभागी होण्यासाठी ज्या कमतरता आहेत, त्या पूर्ण करण्यासाठी, त्याशिवाय हा आराखडा तयार करण्यासाठी सनदी अधिकारी नेमण्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल, असे महापौर दत्तात्रय धनकवडे यांनी या वेळी बोलताना स्पष्ट केले.

 

Web Title: Try for smart city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.