कोरोना मुक्तीसाठी सर्वांनी प्रयत्न करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2021 04:11 AM2021-05-01T04:11:03+5:302021-05-01T04:11:03+5:30
--- तळेगाव ढमढेरे : शिक्रापूर येथे शंभर बेडच्या कोवीड केअर सेंटरचे उद्घाटन करण्यात आले. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन ...
---
तळेगाव ढमढेरे : शिक्रापूर येथे शंभर बेडच्या कोवीड केअर सेंटरचे उद्घाटन करण्यात आले.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन शिरूर तालुक्यातील अनेक ठिकाणी आमदार ॲड. अशोक पवार यांच्या माध्यमातून कोविड सेंटर उभारण्यात आलेले आहेत.
शिक्रापूर,तळेगाव ढमढेरे परिसरात कोरोणाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शिक्रापूर येथे त्रिमूर्ती कार्यालयात शंभर बेडचे कोवीड केअर सेंटरचे उद्घाटन पुणे जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन समितीच्या माजी सभापती सुजाता पवार व प्रांताधिकारी संतोषकुमार देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी पुणे जिल्हा परिषद सदस्या कुसुम मांढरे, ॲड. सुदीप गुंदेचा, पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य पंडित दरेकर, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. दामोदर मोरे, तळेगाव ढमढेरेच्या सरपंच अंकिता भुजबळ, उपसरपंच नवनाथ ढमढेरे, ग्रामपंचायत सदस्य सचिन ढमढेरे, ग्रामविकास अधिकारी संजय खेडकर, तलाठी ज्ञानेश्वर भराटे, नायब तहसीलदार ज्ञानदेव यादव युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संकेत गवारे आदी उपस्थित होते.
शिक्रापूर (ता. शिरूर) येथील त्रिमूर्ती गार्डन मंगल कार्यालय या ठिकाणी शिक्रापूर व तळेगाव ढमढेरे गावांच्या मध्यवर्ती ठिकाणी कोविड सेंटर उभारण्याची मागणी परिसरातील अनेक पदाधिकाऱ्यांनी आमदार अशोक पवार यांच्याकडे केली होती. बाधित रुग्णांना चांगल्या सुविधा देण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे तसेच कोविड सेंटरला मदत करण्यासाठी सामाजिक संस्थांनी देखील पुढे यावे असे आवाहन पुणे जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन समितीच्या माजी सभापती सुजाता पवार यांनी केले आहे.
--
फोटो क्रमांक : ३०तेलेगाव ढमढेरे शि क्रापूर कोवीड सेंटर
(फोटो ओळ -शिक्रापूर ता. शिरूर येथे कोविड सेंटरचे उद्घाटन करताना सुजाता पवार व इतर मान्यवर.)