देशात लोकशाहीऐवजी धर्मसंसद आणण्याचा प्रयत्न - कुमार सप्तर्षी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2019 02:45 AM2019-02-03T02:45:52+5:302019-02-03T02:46:16+5:30

संसदीय लोकशाहीपेक्षा धर्मसंसद हा शब्द देशात वाढत आहे. प्रत्यक्षात संसद आणि धर्माचा काहीही संबंध नाही. ज्यांना देशात लोकशाही नको आहे, ते धर्मसंसद आणण्याचा प्रयत्न करीत आहेत.

Trying to bring religion into place instead of democracy - Kumar Saptarshi | देशात लोकशाहीऐवजी धर्मसंसद आणण्याचा प्रयत्न - कुमार सप्तर्षी

देशात लोकशाहीऐवजी धर्मसंसद आणण्याचा प्रयत्न - कुमार सप्तर्षी

पुणे  - संसदीय लोकशाहीपेक्षा धर्मसंसद हा शब्द देशात वाढत आहे. प्रत्यक्षात संसद आणि धर्माचा काहीही संबंध नाही. ज्यांना देशात लोकशाही नको आहे, ते धर्मसंसद आणण्याचा प्रयत्न करीत आहेत. संसदेचे तुकडे करण्याकरिता धर्माचे घाव घातले जात आहेत, अशी टीका ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. कुमार सप्तर्षी यांनी केली.
नºहे येथील डॉ. सुधाकरराव जाधवर सोशल अँड एज्युकेशनल ट्रस्टतर्फे चौथ्या युवा संसदेचे आयोजन करण्यात आले. संसदेचे उद्घाटन सप्तर्षी यांच्या हस्ते झाले. या वेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुधाकरराव जाधवर, खजिनदार सुरेखा जाधवर, संस्थेचे उपाध्यक्ष अध्यक्ष अ‍ॅड. शार्दूल जाधवर आदी उपस्थित होते. आमदार अ‍ॅड. यशोमती ठाकूर, आमदार अ‍ॅड. लक्ष्मण पवार, नगरसेवक आबा बागुल, जिल्हा परिषद सदस्या सुलक्षणा सलगर, सरपंच वंदना भिलारे, सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.
डॉ. सप्तर्षी म्हणाले, प्रत्यक्षात कोणाचीही डोकी न उडवता, डोक्यात बदल करणे हा लोकशाही मार्ग आहे. सध्या धर्माच्या नावावर मतदान होत आहे. माणसाला माणसाशी जोडण्याकरिता जे सांगावे लागते, तो धर्म. माणसाला माणसापासून तोडणारा धर्म नव्हे. लोकशाहीमध्ये व्यक्ती आणि त्याच्या चांगल्या विचारांना मतदान व्हायला हवे. अमित गोगावले यांनी सूत्रसंचालन केले.

मी काय गुन्हा केला ते पक्षाने सांगावे
गेल्या ४० वर्षांत मी एकही निवडणूक हरलो नाही. या काळात संघर्ष करीत पारदर्शी कारभार केला. तरीही मला भ्रष्टाचारी ठरविले. माझ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले. ते खरे की खोटे, हे कोणी पाहत नाही. पक्ष आणि सरकारला माझा प्रश्न आहे की, मी काय गुन्हा केला ते सांगावा, असा सवाल भाजपाचे नेते एकनाथ खडसे यांनी शनिवारी केला. तुमच्या मनातील मंत्री मीच असल्याचे त्यांनी सांगितले.
युवा संसदेमध्ये ते बोलत होते. या वेळी जलसंपदामंत्री विजय शिवतारे यांना पुरस्कार देण्यात आला. या वेळी आमदार विनायक मेटे, डॉ. नीलम गोºहे, संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुधाकरराव जाधवर आदी उपस्थित होते.
 

Web Title: Trying to bring religion into place instead of democracy - Kumar Saptarshi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.