दाजीला मारण्याचा प्रयत्न; बहिणीला त्रास दिल्याबद्दल मेहुण्याचे कृत्य

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2018 03:27 AM2018-09-20T03:27:57+5:302018-09-20T03:28:28+5:30

बहिणीवर संशय घेतो, या कारणावरून मेहुण्याने दोन साथीदारांच्या मदतीने तिच्या पतीवर कोयत्याने वार करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. 

Trying to kill Daji; Mehun's act about harassing sister | दाजीला मारण्याचा प्रयत्न; बहिणीला त्रास दिल्याबद्दल मेहुण्याचे कृत्य

दाजीला मारण्याचा प्रयत्न; बहिणीला त्रास दिल्याबद्दल मेहुण्याचे कृत्य

googlenewsNext

पुणे : बहिणीवर संशय घेतो, या कारणावरून मेहुण्याने दोन साथीदारांच्या मदतीने तिच्या पतीवर कोयत्याने वार करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. या घटनेत आशिष बसवंत तडवळकर (वय २६, रा़ सदानंद हाईट्स, शंकरनगर, आंबेगाव, कात्रज) हे गंभीर जखमी झाले आहेत.
भारती विद्यापीठ पोलिसांनी तडवळकर यांचा मेहुणा अमित दीपक आरडे (वय २६, रा़ मार्तंड हाईट्स, सहकारनगर) व अमोल वेनपुरे या दोघांना अटक केली आहे. लखन जगताप हा पळून गेला आहे़ ही घटना मंगळवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास आंबेगाव खुर्द येथील सच्चाईमाता मंदिराशेजारील पाण्याच्या टाकीजवळ घडली.
याबाबत, पोलिसांनी सांगितले की, आशिष तडवळकर हा चालक म्हणून काम करतो़ त्याचा अमित आरडे याच्या बहिणीशी प्रेमविवाह झाला आहे़ त्यांना दोन लहान मुले आहेत़ गेल्या काही दिवसांपासून आशिषची पत्नी सारखी मोबाईलवर बोलत असे, यावरून त्यांच्यात वारंवार भांडणे होऊ लागली होती़ मोबाईलवर इतक्या वेळ कोणाशी बोलते, असे विचारून आशिष तिच्यावर संशय घेऊ लागला होता़ त्यावरून त्यांच्या वाद झाल्याने दहा दिवसांपूर्वी ती माहेरी निघून गेली होती. 
आशिष तडवळकर याच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे़ या घटनेची माहिती मिळताच उपायुक्त बच्चनसिंग, सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र रसाळ, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू पवार, पोलीस निरीक्षक विष्णू ताम्हाणे व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. भारती विद्यापीठ पोलिसांनी दोघांना अटक केली असून, सहायक पोलीस निरीक्षक डी़ आऱ मदने अधिक तपास करीत आहेत. 

कोयत्याने केले वार
मंगळवारी दुपारी अमित आरडे हा अमोल वेनपुरे, लखन जगताप यांना घेऊन सच्चाईमाता मंदिराजवळील पाण्याच्या टाकीवर गेले़ तेथून अमोल वायेकर याने आशिष याला फोन लावला व तुझा मेहुणा अमित हा त्याच्या मित्रासोबत आला आहे़
तू तेथे ये, असे सांगितले़ त्यानुसार आशिष तेथे गेला़ तेव्हा दोघांनी त्याला हाताने मारहाण केली़ अमित आरडे याने दुचाकीच्या डिकीतून कोयते काढले़ त्याने प्रथम आशिष यांच्या डोक्यात कोयता मारला़ त्यानंतर, अमोल वेनपुरे याने त्याला कोयत्याने मारण्यास सुरुवात केली असता, त्याचा वार चुकला व आशिष याच्या डाव्या हातावर वार बसला़ लखन जगताप याने पाठीवर वार केला व ते पळून गेले़

Web Title: Trying to kill Daji; Mehun's act about harassing sister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे