प्रेयसीला विष पाजून जिवे मारण्याचा प्रयत्न

By admin | Published: June 29, 2017 03:34 AM2017-06-29T03:34:51+5:302017-06-29T03:34:51+5:30

लग्नाला नकार दिल्याने प्रियकराने प्रेयसीला विष पाजून जिवे मारण्याचा प्रयत्न केला व विष घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला.

Trying to poison lover and kill him | प्रेयसीला विष पाजून जिवे मारण्याचा प्रयत्न

प्रेयसीला विष पाजून जिवे मारण्याचा प्रयत्न

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नारायणगाव : लग्नाला नकार दिल्याने प्रियकराने प्रेयसीला विष पाजून जिवे मारण्याचा प्रयत्न केला व विष घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. नारायणगाव पोलिसांनी प्रियकरावर जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. हे प्रेमी युगुल आंबेगाव तालुक्यातील असून हा प्रकार नारायणगाव येथील गणपीर बाबा डोंगरावर घडला, अशी माहिती नारायणगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक टी़ वाय़ मुजावर यांनी दिली़
स्वप्निल शंकर इंदोरे (रा़ चांडोली, ता़ आंबेगाव) या तरुणावर दि़ २७ रोजी मुलीच्या फिर्यादीवरून नारायणगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत मुजावर यांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वप्निल व रांजणी येथील प्रेयसी यांच्यात एक वर्षापासून प्रेमसंबंध होते़ मुलगी ही नारायणगाव येथे द्वितीय वर्षात कॉलेजचे शिक्षण घेते़ मुलीचे लग्न दुसऱ्या व्यक्तीबरोबर जमलेले आहे़ प्रेयसीचे लग्न जमल्याचे समल्यावर स्वप्निलने दि़ १९ जून रोजी १२.३० वा. फोन करून नारायणगाव बस स्थानकावर बोलावले़ बस स्थानकावर गर्दी असल्याने ते कायम भेटत असलेल्या गणपीर बाबा मंदिराच्या ठिकाणी दोघेही गेले़ स्वप्निलने त्याच्या मोबाईलमध्ये असलेले दोघांचे फोटो दाखविले. या वेळी मुलीने ‘माझे लग्न जमलेले आहे़ माझा विषय सोडून दे,’ असे सांगूनही स्वप्निलने, ‘तुझ्याच बरोबर लग्न करणार आहे. तुझे दुसऱ्याबरोबर लग्न होऊ देणार नाही,’ असे सांगून खिशातून विषाची बाटली काढून तिच्या डोक्यात मारली व तिच्या तोंडात ती ओतली़ ती चक्कर येऊन पडल्यानंतर स्वप्निलनेदेखील विष घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला़
नारायणगाव येथील एका खासगी रुग्णालयात मुलीला उपचांरासाठी दाखल केले असून तिची प्रकृती स्थिर आहे़ तिने दिलेल्या फिर्यादीवरून स्वप्निल इंदोरे याच्यावर प्रेयसीला जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Trying to poison lover and kill him

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.