चाकू पोटात खुपसून मारण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2021 04:11 AM2021-02-09T04:11:37+5:302021-02-09T04:11:37+5:30
-- पुणे : मुलांच्या खेळण्यातील भांडणावरून आणि पैशाच्या जुन्या व्यवहारावरून झालेल्या भांडणामध्ये एकाला चाकू खुपसून मारण्याचा प्रयत्न झाला. ...
--
पुणे : मुलांच्या खेळण्यातील भांडणावरून आणि पैशाच्या जुन्या व्यवहारावरून झालेल्या भांडणामध्ये एकाला चाकू खुपसून मारण्याचा प्रयत्न झाला. ही घटना शिरूर येथील बाबानगरमध्ये घडली. याप्रकरणी करण जालिंदर भोळे याच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सुभाष सोनवणे हे जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. सुभाष यांच्या पत्नी कल्पना सुभाष चव्हाण यांनी फिर्याद दिली असून त्यानुसार शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस निरीक्षक खानापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.
---
पूर्व वैमनस्यातून कुटुंबाला मारहाण
पुणे : जमिनीच्या जुना वाद व पंधारा दिवसांपूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून जमावाने एका कुटुंबाला मारहाण केली. ही घटना दौड तालुक्यातील खोर गावाजवळील डोंबेवाडी येथे घटना २९ जानेवारी रोजी सायंकाळी सव्वासातच्या सुमारास घडली. याप्रकरणी सतरा जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. प्रज्वल भाऊसो डोंबे, प्रशांत भाऊसो डोंबे, मनीषा भाऊसो डोंबे, भाऊसो नामदेव डोंबे, गणपत सत्याबा डोंबे, अज नानासो डोंबे, नानासो गणपत डोंबे, वर्षा नानासो डोंबे, सुनंदा बबन डोंबे, सुभद्रा सोपान डोंबे, मालन गणपत डोंबे, अनिता सोपान डो्ंबे, पूज लक्ष्मण डोंबे, शालन ताराबाई डोंबे, ताराबाई चांगदेव डोंबे, नामदेव सत्याबा डोंबे, सुमन भानुदास धावडे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत गोरख बाळासाहेब डोंबे यांनी फिर्याद दिली असून त्यानुसार यवत पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला आहे.
---
शेतीला पाणी देण्याच्या कारणावरून भावांमध्ये हाणामारी
पुणे : शेतीला पाणी देताना संबंधित पाईपला जोडलेल्या शेजारील असलेल्या सख्ख्या भावाच्या शेतातील पाईपही जोडलेली होती ती पाईपलाईन काढली नाही, यामुळे सख्या भावानेच भावाला मारहाण केली. याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना जेजुरीजवळील पानसरे मळाहद्दीमध्ये घडली. याप्रकरणी हसन पापाभाई पानसरे, अमीर हसन पानसरे असे गुन्हा दाखल झालेल्यांची नाव आहे. शफीमहंमद पापाभाई पानसरे यांनी फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे. त्यानुसार जेजुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
---
अनधिकृत बांधकामाचे फोटो काढल्याने मारहाण
पुणे : लोणावळ्यातील टाटा कंपनीच्या जागेमध्ये अनधिकृत बांधकाम केल्याचे फोटो काढल्याने फोटो काढणाऱ्या टाटा कंपनीच्या कर्मचाऱ्याला जमावाने मारहाण केली. ही घटना मुळसी तालुक्यातली वडगाव येथे ४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास घडली. याप्रकरणी गणपत वाशीवले,एकनाथ दिघे, सुभाष वाघ, दीपक साकळे व त्याच्या मातोश्री यांच्यासह पंचवीस जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी टाटाचे कर्मचारी राजेश बलदेव तिवारी यांनी फिर्याद दिली असून त्यानुसार पौड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
---
--
समाप्त