मंगळवारी २०५ कोरोनाबाधित, २५० कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 04:15 AM2021-08-25T04:15:09+5:302021-08-25T04:15:09+5:30
पुणे : शहरात मंगळवारी पुन्हा एकदा कोरोनाबाधितांचा आकडा १०० च्या पुढे गेला असून, आज दिवसभरात २०५ कोरोनाबाधित आढळून आले ...
पुणे : शहरात मंगळवारी पुन्हा एकदा कोरोनाबाधितांचा आकडा १०० च्या पुढे गेला असून, आज दिवसभरात २०५ कोरोनाबाधित आढळून आले आहेत़, तर २५० जण कोरोनामुक्त झाले आहेत़ आज विविध तपासणी केंद्रांवर ५ हजार ८११ संशयितांची तपासणी करण्यात आली आहे. तपासणीच्या तुलनेत कोरोनाबाधितांची टक्केवारी ३़ ५२ टक्के इतकी आढळून आली आहे़
शहरातील सक्रिय रुग्ण संख्या ही १ हजार ८८८ असून, आज दिवसभरात ५ जणांचा मृत्यू झाला आहेत. यापैकी २ जण हे पुण्याबाहेरील आहेत़ शहरातील आजचा मृत्यूदर हा १.८० टक्के इतका आहे़
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील गंभीर रुग्ण संख्या ही २०३ इतकी असून, ऑक्सिजनसह उपचार घेणाऱ्यांची संख्या २४२ इतकी आहे. शहरात आत्तापर्यंत ३० लाख ७३ हजार ८३२ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी ४ लाख ९३ हजार ७८६ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तर, यापैकी ४ लाख ८३ हजार ५ जण कोरोनामुक्त झाले आहे. शहरात आजपर्यंत ८ हजार ८९३ जणांचा मृत्यू झाला आहे.