मंगळवारी २१८ कोरोनाबाधित, २३९ कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:16 AM2021-09-08T04:16:08+5:302021-09-08T04:16:08+5:30
पुणे : शहरात मंगळवारी २१८ कोरोनाबाधित आढळून आले असून, २३९ जण कोरोनामुक्त झाले आहेत़ आज विविध तपासणी केंद्रांवर ...
पुणे : शहरात मंगळवारी २१८ कोरोनाबाधित आढळून आले असून, २३९ जण कोरोनामुक्त झाले आहेत़ आज विविध तपासणी केंद्रांवर ६ हजार ४२५ संशयितांची तपासणी करण्यात आली असून, तपासणीच्या तुलनेत कोरोनाबाधितांची टक्केवारी ३़ ३९ टक्के इतकी आढळून आली आहे.
शहरातील सक्रिय रुग्णसंख्या २ हजार १४१ इतकी आहे. आज दिवसभरात ९ जणांचा मृत्यू झाला आहे. यापैकी ४ जण हे पुण्याबाहेरील आहेत़ शहरातील आजचा मृत्यूदर हा १.८० टक्के इतका आहे़
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील गंभीर रुग्णसंख्या ही २११ इतकी असून, ऑक्सिजनसह उपचार घेणाऱ्यांची संख्या २९४ इतकी आहे. शहरात आतापर्यंत ३१ लाख ९२ हजार ५६५ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी ४ लाख ९७ हजार १५५ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तर यापैकी ४ लाख ८६ हजार ५६ जण कोरोनामुक्त झाले आहे. शहरात आजपर्यंत ८ हजार ९५८ जणांचा मृत्यू झाला आहे.