मंगळवारी २२६ कोरोनाबाधित, तर २५४ कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:13 AM2021-08-12T04:13:24+5:302021-08-12T04:13:24+5:30
पुणे : शहरात मंगळवारी २२६ कोरोनाबाधित आढळून आले असून, २५४ जण कोरोनामुक्त झाले आहेत़ आज विविध तपासणी केंद्रांवर ...
पुणे : शहरात मंगळवारी २२६ कोरोनाबाधित आढळून आले असून, २५४ जण कोरोनामुक्त झाले आहेत़ आज विविध तपासणी केंद्रांवर ७ हजार ६२० संशयितांची तपासणी करण्यात आली असून, तपासणीच्या तुलनेत कोरोनाबाधितांची टक्केवारी २़ ९६ टक्के इतकी आढळून आली आहे.
दरम्यान, आज दिवसभरात १७ जणांचा मृत्यू झाला असून, यापैकी १० जण हे पुण्याबाहेरील आहेत़ शहरातील सक्रिय रुग्ण संख्या ही २ हजार ५१ असून, शहरातील आजचा मृत्यूदर हा १़ ८० टक्के इतका आहे.
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील गंभीर रुग्ण संख्या ही २०३ इतकी असून, ऑक्सिजनसह उपचार घेणाऱ्यांची संख्या ३२९ इतकी आहे. शहरात आत्तापर्यंत २९ लाख ५७ हजार ८९६ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी ४ लाख ८९ हजार २४७ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तर, यापैकी ४ लाख ७८ हजार ३७३ जण कोरोनामुक्त झाले आहे. शहरात आजपर्यंत ८ हजार ८२३ जणांचा मृत्यू झाला आहे.