अवयवदान जनजागृतीसाठी मंगळवारी रॅली

By admin | Published: August 28, 2016 04:20 AM2016-08-28T04:20:48+5:302016-08-28T04:20:48+5:30

अवयवदानातून पीडितांची जीवनज्योत फुलविण्यासाठी शासनाच्या वैद्यकीय शिक्षण, आरोग्य सेवा आणि विभागीय प्रत्यारोपण समन्वय समितीच्या वतीने ३० आॅगस्ट रोजी

Tuesday rally to organize organ camps | अवयवदान जनजागृतीसाठी मंगळवारी रॅली

अवयवदान जनजागृतीसाठी मंगळवारी रॅली

Next

पुणे : अवयवदानातून पीडितांची जीवनज्योत फुलविण्यासाठी शासनाच्या वैद्यकीय शिक्षण, आरोग्य सेवा आणि विभागीय प्रत्यारोपण समन्वय समितीच्या वतीने ३० आॅगस्ट रोजी पुण्यात जनजागृती महाअभियान रॅली निघणार आहे.
माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, अभिनेते राहुल सोलापूरकर, अभिनेत्री मृणाल कुलकर्णी आदी मान्यवर रॅलीमध्ये सहभागी होणार आहे.
याबाबत माहिती देताना बी. जे. मेडिकल महाविद्यालय व ससून शासकीय रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले म्हणाले, ‘‘अवयवदानाने मृत्यूच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या अनेक रुग्णांना जगण्याची संधी मिळू शकते. मृत्यूनंतरही दुसऱ्यांच्या शरीरात जिवंत राहू शकतो; मात्र याबाबत आपल्या देशात जनजागृती करण्याची आवश्यकता आहे.’’
डॉ. चंदनवाले पुढे म्हणाले, ‘‘सध्या देशात सुमारे ५ लाख मूत्रपिंड, ५० हजार यकृत आणि २ हजारांहून अधिक हृदय विकारांनीग्रस्त रुग्ण असून, या रुग्णांना अवयवांची गरज आहे. मूत्रपिंड विकारावर कृत्रिम रक्तशुद्धीकरण हा पर्याय आहे; मात्र यकृत, हृदय, फुफ्फुसविकार यांनी ग्रस्त असणाऱ्यांना नवीन अवयव प्रत्यारोपण हा एकमेव मार्ग आहे. प्रत्येक कुटुंबातील सदस्यांना अवयवदानाची जाणीव आणि माहिती झाल्यास त्यांची अवयवदानासाठी सहज संमती मिळू शकेल व अनेकांना जीवदान मिळेल.’’
ससून रुग्णालयातर्फे शहरातील विविध स्वयंसेवी संस्था, रोटरी क्लब, लायन्स क्लब यांबरोबरच गणेश मंडळांनाही आपापल्य स्तरावर जनजागृती करावी, असे आवाहन करण्यात येणार आहे. याबरोबरच बी. जे. मेडिकलमधील प्राध्यापकांचे गट करण्यात आले असून, शहरातील शाळा आणि महाविद्यालयांमध्येही जनजागृती करण्यात येणार आहे.
झेटटीसीसीच्या माहितीनुसार, गेल्या महिन्यापासून पुण्यात १५० रुग्ण यकृताच्या आणि २७५ रुग्ण किडनी दात्यांच्या प्रतीक्षेत आहेत. पुणे विभागामध्ये सातारा, कोल्हापूर, सांगली व पुणे या शहरांचा समावेश आहे.
पुढील काळात प्रतीक्षा यादीमध्ये भर पडू नये, यासाठी पुणेकर नागरिकांनी अवयवदानाचा विचार करावा. व्यक्ती ब्रेनडेड असेल, तर तिचे किडनी, यकृत, हृदय, फुफ्फुस व स्वादुपिंड यांचे दान करता येऊ शकते. आणि व्यक्ती ब्रेनडेड न होता इतर कारणांनी मृत घोषित झाला असेल, तर ४ तासांच्या आत त्या व्यक्तीचे त्वचा, डोळे, हाडे दान करता येऊ शकतात, असे डॉ. चंदनवाले यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

शहरातील सहा मुख्य भागांत महाफेरी
- महाअभियानांतर्गत ३० आॅगस्टला शहरातील सहा मुख्य भागांतून महाफेरीचे आयोजन केले आहे. संचेती हॉस्पिटल चौक, वाडिया कॉलेज, आझम कँपस, शनिवारवाडा, पूलगेट बसस्टँड व सेव्हन लव्ह चौक या ठिकाणांहून या रॅलीला सुरुवात होणार आहे.
- ३१ आॅगस्ट रोजी कार्यशाळा, अवयवदान चर्चासत्र, चित्रकला, निबंध स्पर्धा घेण्यात येतील, तर १ सप्टेंबर रोजी महा अवयवदान अभियान नोंदणी शिबिराचे उद्घाटन होऊन आॅनलाइन नोंदणी सुरू करण्यात येईल. नोंदणी झालेली माहिती राज्यशासनाला पुरविली जाईल, असेही डॉ. अजय चंदनवाले यांनी सांगितले.
- अधिक माहितीसाठी नागरिकांनी १८००२७४७४४४ व
१८००११४७७० या क्रमांकावर संपर्क साधावा किंवा आॅनलाइन नोंदणीसाठी www.dmer.org व  www.ztccmumbai.org  या वेबसाइटवर फॉर्म भरावा, असे आवाहन डॉ. चंदनवाले यांनी केले आहे.

Web Title: Tuesday rally to organize organ camps

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.