मंगळवारी ३८४ कोरोनाबाधितांची वाढ, तर ८५८ जण कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 04:09 AM2021-06-02T04:09:22+5:302021-06-02T04:09:22+5:30
पुणे : पुणे शहरात मंगळवारी ३८४ नवे कोरोनाबाधित आढळून आले आहेत़ आज दिवसभरात विविध तपासणी केंद्रांवर ५ हजार ९६४ ...
पुणे : पुणे शहरात मंगळवारी ३८४ नवे कोरोनाबाधित आढळून आले आहेत़ आज दिवसभरात विविध तपासणी केंद्रांवर ५ हजार ९६४ संशयितांची तपासणी करण्यात आली़ तपासणीच्या तुलनेत कोरोनाबाधितांची टक्केवारी ही ६़ ४३ टक्के इतकी आहे़
दिवसभरात ८५८ कोरोनाबाधित कोरोनामुक्त झाले असून, शहरातील सक्रिय रुग्णसंख्या ही ५ हजार ५१८ इतकी आहे़ दिवसभरात ३९ जणांचा मृत्यू झाला असून, यापैकी ११ जण हे पुण्याबाहेरील आहेत़ आजचा शहरातील मृत्यूदर हा १़ ७६ टक्के इतका आहे़
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील विविध रुग्णालयामध्ये सध्या १ हजार ४६६ जणांवर ऑक्सिजनसह उपचार सुरू असून, शहरातील गंभीर रुग्णसंख्या ही ७८४ इतकी आहे़ शहरात आत्तापर्यंत २५ लाख २ हजार ७०१ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी ४ लाख ७० हजार ३११ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत़ तर यापैकी ४ लाख ५६ हजार ५०९ जण कोरोनामुक्त झाले आहेत़ तर आतापर्यंत शहरात ८ हजार २८४ जणांचा मृत्यू झाला आहे़
-----------