बारामतीत ग्रामपंचायत निवडणुकीत २ गटात तुफान राडा; भाजपच्या नेत्यासह ९६ जणांवर गुन्हे दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2023 10:31 AM2023-11-07T10:31:54+5:302023-11-07T10:32:01+5:30
गोंधळ घालणे व गाड्यांच्या काचा फोडल्याप्रकरणी खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाचे उपाध्यक्ष व भाजपचे नेते दुर्योधन भापकर यांच्या सह तब्बल ९६ जणांवर गुन्हा दाखल
सोमेश्वरनगर: निवडणूक निकाल लागल्यानंतर बारामती तालुक्यातील सायंबाचीवाडी येथे दोन गटात तुफान राडा झाला. गोंधळ घालणे व गाड्यांच्या काचा फोडल्याप्रकरणी खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाचे उपाध्यक्ष व भाजपचे नेते दुर्योधन भापकर यांच्या सह तब्बल ९६ जणांवर वडगाव निंबाळकर पोलिसात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
याबाबत तौसीफ महम्मद मनेरी वय 36 यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून 1) दुर्योधन भापकर, 2) साहेबराव भापकर, 3) गौरव भापकर, 4) निखील भापकर, 5) आदित्य भापकर, 6) हर्षद भापकर, 7) मयुर भापकर, 8) विजय भापकर 9) केशव भापकर, 10) दिपक भापकर 11) विकास अभंग, 12) नानासो भापकर 13) सुरज जगताप, 14) वैभव भापकर, 15) मंथन भापकर, 16) सौरभ घाडगे, 17) यश भापकर, 18) प्रविण जगताप, 19) यश जगताप, 20) भरत आंधळे, 21) ऋषिकेश जगताप, 22) वैभव जगताप, 23) हणुमंत भगत, 24) विकास जगताप 25) श्रीकांत भापकर 26) मेघराज, जगताप, 27) रघुनाथ भगत, 28) सुभाष जगताप 29) मयुर जगताप 30) प्रतिक जगताप, 31) मंगेश जगताप 32) प्रणव जगताप 33) शतायु जगताप 34)दिलीप जगताप 35)प्रमोद जगताप 36)निलेश जगताप 60 लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
दि. ६ रोजी दु. सव्वादोन वाजण्याच्या सुमारास सायंबाचीवाडी गावातील जगताप वस्तीकडे जाणा-या हमरस्त्यावर मारुती दशरथ घाडगे यांच्या घरासमोर वरील आरोपींनी बेकायदेशिर गर्दी जमाव जमवुन आरडा ओरडा ,मारामारी ,दंगा करुन शांतता भंग केला आहे. तसेच खाजगी गाड्यांच्या काचा फोडुन नुकसान केले .