तुघलकी कारभार बंद करावा : दिपाली धुमाळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 04:14 AM2021-08-29T04:14:13+5:302021-08-29T04:14:13+5:30
पुणे : सत्ताधारी यांच्या दबावाने मोठे घोटाळे करायचे आणि मग गोरगरिबांना नाहक त्रास द्यायचा, असला तुघलकी कारभार महापालिका प्रशासनाने ...
पुणे : सत्ताधारी यांच्या दबावाने मोठे घोटाळे करायचे आणि मग गोरगरिबांना नाहक त्रास द्यायचा, असला तुघलकी कारभार महापालिका प्रशासनाने बंद करावा, असे मत पालिकेतील विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ यांनी व्यक्त करून, गोरगरिबांना जगण्याची भ्रांत असताना दैनंदिन १० लाख दंड सक्तवसुलीचे आदेश काढणे कितपत योग्य आहे असा प्रश्न उपस्थित केला.
कोरोनाकाळात सर्वच व्यावसायिकांचे उत्पन्न कमी झाले असून, पथारी व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. अशावेळी दैनंदिन १० लाख दंड सक्तवसुलीचे आदेश काढले जात आहेत. महापालिकेचे उत्पन्न वाढवायचेच असेल तर खर्चात बचत करावी, मिळकत कर वसूल करण्यावर भर द्यावा, ज्या मिळकतीवर टॅक्स लावला नाही त्या शोधून टॅक्स लावला. परंतु गोरगरिबांना त्रास द्यायचा हा कारभार सध्या महापालिकेत सुरू असल्याचा आरोप धुमाळ यांनी केला आहे.
दरम्यान कामे न करता बिले देणे, कोट्यवधी चे टेंडर रिंगकरून काढून कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार करणे. अशा कारभारामुळे पुणेकर येत्या निवडणुकीत सत्ताधारी यांना नक्कीच धडा शिकवतील असेही धुमाळ म्हणाल्या.
------