तुकोबारायांची तपोभूमी भंडारा डोंगरावरील यंदाचा माघ शुद्ध दशमी सोहळा रद्द
By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2021 12:46 PM2021-02-06T12:46:08+5:302021-02-06T12:49:15+5:30
जगदगुरु संत तुकोरायांना गुरुंचा अनुग्रह, साक्षात्कार झाला ही पवित्र तिथी म्हणजे माघ शुध्द दशमी.
देहूगाव : जगद्गुरु श्री संतश्रेष्ठ तुकोबारायांची चिंतनभूमी, तपोभूमी असणाऱ्या श्री क्षेत्र भंडारा डोंगरावर माघ शुध्द दशमीच्या निमित्ताने होणारा अखंड हरिनाम सप्ताह, गाथा पारायण व कीर्तन महोत्सव यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या आदेशानुसार रद्द केला आहे.
जगदगुरु संत तुकोरायांना गुरुंचा अनुग्रह, साक्षात्कार झाला ही पवित्र तिथी म्हणजे माघ शुध्द दशमी. वारकरी सांप्रदायात या माघ शुध्द दशमीला आगळे वेगळे महत्व आहे. या निमित्ताने गेली ५० वर्षे श्री क्षेत्र भंडारा डोंगरावर संत तुकाराम महाराजांचा जन्मोत्सव म्हणजे वसंत पंचमी ते माघ शुध्द त्रयोदशीपर्यंत विठ्ठल रखुमाई संत तुकाराम महाराज भंडारा डोंगर ट्रस्ट तर्फे अखंड हरिनाम सप्ताह, गाथा पारायण व किर्तन महोत्सव होत असतो. दरवर्षी या गाथा पारायण सोहळ्यामध्ये महाराष्ट्र राज्यातील भाविकांसह कर्नाटक, आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश आदी राज्यातील भाविक सहभागी होत असतात. माघ शुध्द दशमीच्या पवित्र तिथीला दोन ते तीन लाख वारकरी व भाविक दर्शनासाठी येत असतात.
या वैश्विक महामारीच्या संकटकाळात विविध सण व धार्मिक उत्सव संपूर्ण देशभरच साधेपनाने साजरे केले जात आहेत. श्री क्षेत्र भंडारा डोंगरावरील या वर्षीचा दिनांक १६ ते २४ फेब्रुवारीला माघ शुध्द दशमीचा सोहळा रद्द करण्यात आला आहे असे श्री विठ्ठल- रखुमाई संत तुकाराम महाराज भंडारा डोंगर ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब काशिद यांनी जाहिर केले आहे. .
.........
श्री विठ्ठल रखुमाई संत तुकाराम महाराज भंडारा डोंगर ट्रस्ट च्या बैठक झाली. यावेळी नैमित्तीक विधी, अभिषेक, पुजापाठ, हरीपाठ आदी कार्यक्रमांसह अत्यंत साधेपनाने करण्यात येणार आहेत.
...............
गर्दी करू नये जिल्हा प्रशासनाने कोरोना संदर्भात केलेल्या सुचनांचे व नियमावलीचे काटेकोरपने अमंलबजावणी करण्यात येणार आहे. भाविकांनी या सप्ताह कालावधीमध्ये भंडारा डोंगरावरील सर्व कार्यक्रम व अन्नप्रसाद रद्द केल्यामुळे दर्शनासाठी गर्दी करु नये.
-बाळासाहेब काशिद, अध्यक्ष, विठ्ठल- रखुमाई संत तुकाराम महाराज भंडारा डोंगर ट्रस्ट