तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यात गोंधळ, उरळी कांचनमध्ये घोषणाबाजी, नगारा पोलिसांनी ओढला

By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2024 02:31 PM2024-07-03T14:31:06+5:302024-07-03T14:31:45+5:30

रस्त्यावर गोंधळ निर्माण होऊन नगाऱ्याची बैल सोडण्यात आली, पुढे पालखी नगारा पोलिसांनी स्वतः ओढत नेला

Tukaram Maharaj palkhi ceremony chaos sloganeering in Urli Kanchan Nagara police pulled | तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यात गोंधळ, उरळी कांचनमध्ये घोषणाबाजी, नगारा पोलिसांनी ओढला

तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यात गोंधळ, उरळी कांचनमध्ये घोषणाबाजी, नगारा पोलिसांनी ओढला

उरुळी कांचन: सालाबाद प्रमाणे उरळीकांचन शहरांमधून संत तुकाराम महाराजांची पालखी जावी यासाठी ग्रामस्थ पुढारी नेते मंडळी आग्रही होती. पालखी चौकात येण्याअगोदर ग्रामपंचायतचे सरपंच व ग्रामस्थ, पुढारी चौकामध्ये ठिय्या मारून भजन बसले होते. पोलीस प्रशासन ने त्यांना रस्त्यावरून बाजूला करत पालखीला रस्ता मोकळा करून देण्याचा प्रयत्न केला. 

त्यामध्ये रस्त्यावर गोंधळ निर्माण होऊन नगाऱ्याची बैल सोडण्यात आली. इथून पुढे पालखी साधारणता 50 मीटर पर्यंत पोलिसांनी स्वतः नगारा ओढत नेला. त्यामध्ये गोंधळ निर्माण झाला. वारकरी ही संतापले व आम्हाला व आमच्या बैलाला मारहाण झाली असे ते सांगत होते. पोलीस प्रशासन बंदोबस्त करत पालखी पुढे नेत आहेत. उरुळी कांचन चे विद्यमान सरपंच अमित कांचन हे म्हणाले की, जर पालखी सालाबाद प्रमाणे गावात येणार नसेल तर सरळ मार्गे जाऊ द्या, आत मध्ये घालू नये. पालखी सोहळ्याला गालबोट लागल्याची चर्चा नागरिकांमध्ये होत आहे.

Web Title: Tukaram Maharaj palkhi ceremony chaos sloganeering in Urli Kanchan Nagara police pulled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.