शिवरायांच्या आयुष्यात तुकाराम महाराजांची भूमिका महत्त्वाची- PM नरेंद्र मोदी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2022 03:06 PM2022-06-14T15:06:07+5:302022-06-14T15:09:47+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देहूमध्ये शिळा लोकार्पण सोहळा
पुणे : तुकोबारायांची शिळा ही भक्ती आणि आधाराचं केंद्र आहे. संत तुकाराम महाराज यांचे अभंग अनेक पिढ्यांचे मार्गदर्शक आहेत. संतांच्या कार्यातून नित्य ऊर्जा मिळत राहते. शिळा मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याला येणे मिळणे हे माझे भाग्य असल्याची भावना पंतप्रधान नरेंद्र मोदींनीदेहूमध्ये शिळा लोकार्पण सोहळ्याच्य वेळी मांडल्या.
पुढे बोलताना मोदी म्हणाले, जो भंग होत नाही तो अभंग. शिवरायांच्या आयुष्यात तुकाराम महाराजांची महत्त्वाची भूमिका आहे. संताची उर्जा समजाला गती देण्याचे काम करते. तसेच देशभक्तीसाठी तुकोबांचे अभंग महत्त्वाचे आहेत.
आज देहूत पंतप्रधानांच्या हस्ते शिळा मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडला आहे. त्यानंतर पंतप्रधान मोदी वारकऱ्यांशी संवाद साधला. मावळ तालुक्यातील इंद्रायणीतीरावरील श्री क्षेत्र देहूनगरीत पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रथमच आले होते. त्यानिमित्ताने पंतप्रधानांच्या स्वागताची तयारी संत तुकाराम महाराज देवस्थानाने केली होती. पंतप्रधानांचा सत्कार करण्यासाठी उपरणे, पगडी, टाळ, चिपळ्या, तुळशीची माळ आणि वीणा भेट देऊन करण्यात आला.