तुकाराम मुंडे हाजीर हो!
By admin | Published: May 25, 2017 02:54 AM2017-05-25T02:54:40+5:302017-05-25T02:54:40+5:30
‘पीएमपी’ला महापालिकेने रक्कम देण्याचा विषय स्थायी समितीसमोर होता
लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी : ‘पीएमपी’ला महापालिकेने रक्कम देण्याचा विषय स्थायी समितीसमोर होता. त्या वेळी पीएमपीचे अध्यक्ष, व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंडे हे संचालक मंडळाची बैठक घेण्याकामी टाळाटाळ करत आहेत. कार्यालयीन वेळेनंतरच फोन करायचा, असे संचालकांनाच बेमुर्वतपणे सांगतात.
कार्यभार स्वीकारल्यानंतर त्यांना बोलावूनही आले नाहीत. जोपर्यंत मुंडे महासभेत येऊन नगरसेवकांच्या अडीअडचणी समजावून घेत नाहीत, तोपर्यंत ‘पीएमपी’ अर्थसाह्य करणार नाही, अशी भूमिका स्थायी समिती सदस्यांनी घेतली आहे.
पीएमपी संचलन तुटीपोटी पावणेसहा कोटी रुपये देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीच्या विषय पत्रिकेवर होता. या सभेत ‘पीएमपी’ अर्थसाह्य करण्यासाठी सर्व सदस्यांचे एकमत झाले. पीएमपीचे अध्यक्ष तुकाराम मुंडे यांच्या कार्यपद्धतीवर चर्चा झाली. अध्यक्षा सीमा सावळे म्हणाल्या, ‘‘संचलन तुटीची रक्कम देण्याची मागणी पीएमपी व्यवस्थापनाने केली आहे. केवळ पैसे घेण्यासाठी अधिकारी स्थायी समितीत येतात. महासभांकडे कोणीही फिरकत नाही. अधिकारी-कर्मचाऱ्यांवर अन्याय होतो, अशा तक्रारी सर्वपक्षीय सदस्यांनी केल्या आहेत.