"मुंढे साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है" तुकाराम मुंढेंच्या समर्थनार्थ पुण्यात झळकले बॅनर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2022 05:53 PM2022-12-04T17:53:27+5:302022-12-04T17:53:56+5:30

मुंढे यांची बदली रद्द झाली पाहिजे या मागणीसाठी काँग्रेस कडून सह्यांची मोहीम

tukaram mundhe Saheb Tum Aage Badho Hum Tumhare Saath Hai Banners in Pune in Support of Tukaram Munde | "मुंढे साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है" तुकाराम मुंढेंच्या समर्थनार्थ पुण्यात झळकले बॅनर

"मुंढे साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है" तुकाराम मुंढेंच्या समर्थनार्थ पुण्यात झळकले बॅनर

googlenewsNext

पुणे : आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांची अवघ्या दोन महिन्यांत पुन्हा एकदा बदली करण्यात आली आहे. सप्टेंबर महिन्यात तुकाराम मुंढे हे आरोग्य आयुक्तपदी रुजू झाले होते. तुकाराम मुंढे यांची पुन्हा २९ नोव्हेंबरला बदली करण्यात आली. त्यांच्याकडे कोणत्याही खात्याचा पदभार अद्याप देण्यात आलेला नाही. दरम्यान, १६ वर्षांच्या सेवेमध्ये तुकाराम मुंढे यांची १५ पेक्षा अधिक वेळा बदली झाली आहे. यावरून तुकाराम मुंढे कर्तव्यदक्ष अधिकारी असल्याची चर्चा सर्वत्र सुरु झाली आहे. त्यातच पुण्यात युवक काँग्रेसच्या वतीने तुकाराम मुंढे यांच्या समर्थनार्थ बॅनर लावण्यात आले आहे. 

पुण्यातील टिळक चौकात युवक काँग्रेस कडून तुकाराम मुंढे यांच्या समर्थनार्थ बॅनर लावण्यात आले आहेत. मुंढे यांची बदली रद्द झाली पाहिजे या मागणीसाठी काँग्रेस कडून सह्यांची मोहीम राबवण्यात येत आहे. ''मुंढे साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है'' अशा प्रकारे समर्थन त्यावरून करण्यात आले आहे.  

सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस तुकाराम मुंढेंकडे आरोग्य आयुक्तपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. आरोग्य भवन येथील कार्यालयात डॉ. रामास्वामी एन. यांच्याकडून त्यांनी पदभार स्वीकारला होता. त्यांच्याकडे राष्ट्रीय आरोग्य अभियानाची जबाबदारी होती. काही दिवसांपूर्वीच आरोग्य आयुक्त तुकाराम मुंडे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आरोग्य केंद्रांना रात्री-बेरात्री भेटी देण्याचे आदेश काढले. रुग्णांना २४ तास वैद्यकीय सेवा मिळून त्यांची प्रकृती सुधारावी असा हेतू आदेशांमागे होता.

तुकाराम मुंढे यांनी आयुक्तपदाची जबाबदारी घेतल्यानंतर आरोग्य कर्मचाऱ्यांच्या शिस्तीबाबत एक परिपत्रक काढले होते. यामध्ये आरोग्य खात्यातील विभाग प्रमुख, प्रादेशिक विभाग प्रमुख, कार्यालय प्रमुख, इतर अधिकारी व कर्मचारी यांना कार्यालयीन शिस्तीचे पालन करण्याबाबत वेळोवळी सूचना देण्यात आल्या होत्या.

Web Title: tukaram mundhe Saheb Tum Aage Badho Hum Tumhare Saath Hai Banners in Pune in Support of Tukaram Munde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.