तुकोबा आले अन् बारामती भक्तिरसात न्हाऊन निघाली

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2022 11:53 AM2022-06-29T11:53:17+5:302022-06-29T11:55:34+5:30

ग्यानबा तुकाराम आणि विठुनामाच्या जयघोषाने कवी मोरोपंतांची बारामतीनगरी दुमदुमली.

Tukoba came and baramati took a bath in devotion | तुकोबा आले अन् बारामती भक्तिरसात न्हाऊन निघाली

तुकोबा आले अन् बारामती भक्तिरसात न्हाऊन निघाली

googlenewsNext

बारामती : कविवर्य मोरोपंतांच्या बारामतीनगरीत मंगळवारी सायंकाळी संतश्रेष्ठ जगद्गुरू तुकोबारायांचा पालखी सोहळा मुक्कामी विसावला. यावेळी भजन, कीर्तन आदी धार्मिक कार्यक्रमांमुळे पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी अवघी बारामती भक्तिरसामध्ये न्हाऊन निघाली. दोन वर्षांनंतर आलेल्या वैष्णवांचे बारामतीकरांनी उत्साहात स्वागत केले.

ग्यानबा तुकाराम आणि विठुनामाच्या जयघोषाने कवी मोरोपंतांची बारामतीनगरी दुमदुमली. शहराच्या वेशीवर पालखीचे बारामती हायटेक टेक्स्टाइल पार्कच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार, बारामती बँकेचे चेअरमन सचिन सातव, प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, यांनी उत्साहात स्वागत केले.
नगरपालिकेच्या वतीने स्वागत कक्षात पालखीचे स्वागत करण्यात आले. शहरातील शारदा प्रांगणात उभारण्यात आलेल्या शामियान्यात पालखी सोहळा सायंकाळी विसावला. यावेळी बारामती शहरातील भाविक मोठ्या प्रमाणात आरतीसाठी उपस्थित होते. बारामती शहरातील विविध तरुण मंडळांनी अन्नदानाचा उपक्रम राबविला, तसेच चहा, फळे वाटप यासह पाण्याच्या बाटल्यांचे वाटप यावेळी करण्यात आले. पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी हुतात्मा स्तंभावर केलेली फुलांची सजावट आणि येथे उभारलेली विठोबाची प्रतिमा सेल्फी पॉइंट ठरली. एन्व्हायर्नमेंटल फोरम ऑफ इंडियाच्या वतीने वारकऱ्यांना स्वच्छतेचे किट देण्यात आले.

-    बुधवारी सकाळी सोहळा सणसर (ता.इंदापूर) मुक्कामासाठी प्रस्थान ठेवणार आहे. तत्पूर्वी काटेवाडी येथे पालखी सोहळ्यातील वैशिष्ट्यपूर्ण मेंढ्यांचे रिंगण पार पडेल.
 

Web Title: Tukoba came and baramati took a bath in devotion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे