अक्षय ऊर्जेचे जनक तुलसी तांती यांचे निधन; सुझलॉन कंपनीला मोठा धक्का

By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2022 05:51 AM2022-10-03T05:51:45+5:302022-10-03T05:52:37+5:30

भारतात अक्षय ऊर्जेची संकल्पना रुजवून त्यात क्रांती घडवून आणण्यात तुलसी तांती यांचा सिंहाचा वाटा आहे.

tulsi tanti father of renewable energy passes away | अक्षय ऊर्जेचे जनक तुलसी तांती यांचे निधन; सुझलॉन कंपनीला मोठा धक्का

अक्षय ऊर्जेचे जनक तुलसी तांती यांचे निधन; सुझलॉन कंपनीला मोठा धक्का

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : भारतीय अक्षय ऊर्जा उद्योगाचे जनक, सुझलॉन एनर्जी लि.चे संस्थापक व व्यवस्थापकीय संचालक तुलसी तांती यांचे शनिवारी मध्यरात्री हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. ते ६४ वर्षाचे होते. भारतात अक्षय क्रांतीचे प्रणेते म्हणून ते ओळखले जात. त्यांच्या मागे मुलगा प्रणव व  मुलगी निधी असा परिवार आहे. ते  २००४ मध्ये पुण्यात स्थायिक झाले होते. 

भारतात अक्षय ऊर्जेची संकल्पना रुजवून त्यात क्रांती घडवून आणण्यात तुलसी तांती यांचा सिंहाचा वाटा आहे.  तांती हे रिन्युएबल एनर्जी काैन्सिल ऑफ कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीजचे अध्यक्ष होते. आपल्या कुशाग्र बुद्धिमत्तेसह कठोर परिश्रमाने त्यांनी सुझलॉन कंपनीला केवळ भारतातीलच नव्हे जगातील अग्रगण्य अक्षय ऊर्जा कंपनी बनविली. तुलसी तांती यांचा जन्म गुजरातमधील राजकोट येथे २ फेब्रुवारी १९५८ रोजी रणछोडभाई आणि रंभाबेन तांती यांच्या पोटी झाला. ते शेतकरी कुटुंबातील तसेच व्यवसायात होते. त्यांना चार भावंडे आहेत. 

बाजारात मोठा हिस्सा

मार्च २००८ मध्ये सुझलॉन पवन टर्बाइन उत्पादक म्हणून जागतिक स्तरावर पाचव्या क्रमांकावर होती. भारतीय बाजारपेठेत तिचा ५० टक्के हिस्सा होता. विंड टर्बाइन जनरेटर तयार करणे आणि ऑपरेशन्स व देखभाल सेवा प्रदान करणे अशा दोन प्रमुख व्यवसायामध्ये कंपनी आहे. 

कंपनीला मोठा धक्का

तांती यांच्या निधनामुळे सुझलॉन कंपनीला मोठा धक्का बसला आहे. कंपनीच्या अधिकारांबाबत १२०० कोटींसंदर्भातील घोषणा ते ११ ऑक्टोबर रोजी करणार होते. सुझलॉन एनर्जी त्यांच्यावरील कर्जाची परतफेड करण्यासंदर्भातील निर्णय घेणार असल्याचे तांती यांनी सांगितले होते. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: tulsi tanti father of renewable energy passes away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे