अक्षय्य तृतीयेदिवशी ५० कोटींची उलाढाल
By admin | Published: April 23, 2015 06:33 AM2015-04-23T06:33:15+5:302015-04-23T06:33:15+5:30
अक्षय्य तृतीयेच्या शुभ मुहुर्तावर सोने आणि वाहन खरेदीस मोठी तेजी होती. सदनिका व जमीन खरेदीसही पसंती दिली गेली. त्याचबरोबर इलेक्ट्रानिक्सच्या
पिंपरी : अक्षय्य तृतीयेच्या शुभ मुहुर्तावर सोने आणि वाहन खरेदीस मोठी तेजी होती. सदनिका व जमीन
खरेदीसही पसंती दिली गेली. त्याचबरोबर इलेक्ट्रानिक्सच्या
वस्तू, कपडे, फर्निचरचे वस्तू मोठ्या प्रमाणात घेतल्या गेल्या. यामुळे शहरातील बाजारपेठेत उत्साह संचारला आहे. मंगळवारी एका दिवसात संपुर्ण बाजारपेठेत ५० कोटीपेक्षा अधिक आर्थिक उलाढाल झाल्याचे चित्र आहे.
सर्वांधिक तेजी सराफ पेढीत होती. सोने खरेदीस मोठी पसंती दिली गेली. पाठोपाठ सदनिका आणि जमीन खरेदीस नागरिकांनी प्राधान्य दिले. दुचाकी आणि चारचाकी मोटार घेण्याचा कल शहरवासींयामध्ये वाढतच आहे. इलेक्ट्रानिक वस्तू, कपडे, फर्निचर आदी बाजारपेठेतही उत्साह जाणवला. शहरातील सर्वच सराफी पेढीत ग्राहकांची झुंबड होती. मंगळवारी एका दिवसात शहरातील ८०० च्या आसपास सराफी पेढीत सोन्यांच्या दागिण्यांची एकूण उलाढाल तब्बल २५ कोटीच्यावर झाल्याचा अंदाज आहे.
अक्षय तृतीयेला सोने खरेदी करण्याची परंपरा आहे. या दिवशी घेतलेले सोने वाढत जाते अशी
श्रद्धा आहे. तसेच, बारा वर्षांनंतर मंगल योग साधून आला होता.
यामुळे आपल्या ऐपतीप्रमाणे नागरिकांनी सोने खरेदी केले.
यामुळे गेल्या काही दिवसामध्ये आलेली मरगळ दूर झाली. गेल्या
वर्षी ३० हजार रुपये तोळे असा सोन्याचा भाव होता. काल तो २६ हजार ७०० ते २७ हजार ५० होता. या संधीचा लाभ अनेकांनी उठविला. सराफी दुकाने नागरिकांनी गजबजली होती. दागिणे खरेदी करण्यास मोठा कल होता.
पूर्वी सोने गुंतवणूक म्हणून खरेदी केले जात होते. वेढणी, बिस्कीट, कॉइन या स्वरुपात सोने घेतले जात होते. मात्र, बाजारपेठेत सोन्याचे दर घटत असल्याने सध्या गुंतवणूकीसाठी सोने खरेदीचे प्रमाण घटले आहेत. दागिणे म्हणून सोन्यास सर्वांधिक पसंती दिली गेली. शहरात एकूण ८०० सराफी पेढी आहेत. काही राष्ट्रीयस्तरावरील मोठ्या पेढ्याची दालने शहरात आहेत. मंगळवारी एका दिवसांत सोन्याची एकूण उलाढाल २५ कोटीच्यावर झाल्याचा अंदाज आहे. ग्राहकांच्या उत्साहामुळे सराफी बाजार तेजीत आला आहे.
मावळात जमीन खरेदीस प्राधान्य
मावळ तालुक्यातील तळेगाव, वडगाव, कामशेत, आंबी, रांजणवाडी आदी भागांत जमीन विक्रीचे
योजना अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर होती. मात्र, त्यास अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. त्यात बीएसएनएलची इंटरनेट यंत्रणा विस्कळीत
झाल्याने व्यवहार पुर्ण करण्यात अडचणी आल्या. काही ठिकाणी व्यवहार झाले नाहीत. (प्रतिनिधी)