चाकण बाजारात ४ कोटी ८० लाखांची उलाढाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2021 04:03 AM2021-02-22T04:03:54+5:302021-02-22T04:03:54+5:30
चाकण : खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये कांद्याची आवक वाढूनही भावात मोठी वाढ ...
चाकण : खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये कांद्याची आवक वाढूनही भावात मोठी वाढ झाली. तळेगाव बटाट्याची आवक स्थिर राहूनही बाजारभावात किंचित घट झाली. भुईमूग शेंगांची आवक झाल्याने भावात घसरण झाली. लसणाची आवक व भावही स्थिर राहिले. गाजर व वाटण्याची आवक घटूनही भाव घसरले.
कोबी,फ्लॉवर,टोमॅटो,वांगी,भेंडी,कारली,काकडी,दुधी भोपळा,दोडका या फळभाज्यांची आवक वाढल्याने बाजारभाव कोसळले. पालेभाज्यांच्या बाजारात मेथी,कोथिंबीर,शेपू भाजीची आवक वाढल्याने भाव घसरले.जनावरांच्या बाजारात जर्शी गाय, बैल, म्हैशी व शेळ्यांमेंढयांच्या संख्येत घट झाली.एकूण उलाढाल ४ कोटी ८० लाख रुपये झाली.
चाकण येथील बाजारात कांद्याची एकूण आवक ४,००० क्विंटल झाली.
गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक ७०० क्विंटलने वाढूनही कांद्याच्या भावात ५०० रुपयांची मोठी वाढ झाली. तळेगाव बटाट्याची एकूण आवक राहूनही बाजारभावात १०० रुपयांची घट झाली. बटाट्याचा कमाल भाव १,५०० रुपयांवरुन १,४०० रुपयांवर घसरले. लसणाची एकूण आवक १५ क्विंटल झाली. मागील आठवड्याच्या तुनलेत स्थिर राहूनही बाजारभाव ८,००० रुपयांवर आले.भुईमुग शेंगांची २४ क्विंटल आवक झाल्याने भाव ७,००० स्थिरावले.
चाकण बाजारात हिरव्या मिरचीची एकूण आवक ७७ क्विंटल झाली. हिरव्या मिरचीला २,००० ते ४,००० रुपये असा भाव मिळाला.
* शेतीमालाची एकूण आवक व बाजारभाव पुढीलप्रमाणे –
कांदा - एकूण आवक - ४,००० क्विंटल. भाव क्रमांक १. ४,३०० रुपये, भाव क्रमांक २. ३,८०० रुपये, भाव क्रमांक ३. ३,००० रुपये.
बटाटा - एकूण आवक - १,००० क्विंटल. भाव क्रमांक १. १,४०० रुपये, भाव क्रमांक २. १,२०० रुपये, भाव क्रमांक ३. १,००० रुपये.
फळभाज्या
चाकण येथील फळभाज्यांच्या बाजारात एकूण आवक डागांमध्ये व प्रती दहा किलोंसाठी डागांना मिळालेले भाव पुढीलप्रमाणे -
टोमॅटो - ५३ पेट्या ( ४०० ते ६०० रू. ), कोबी - १०७ पोती ( १०० ते ४०० रू. ), फ्लॉवर - ११५ पोती ( ४०० ते ८०० रु.),वांगी - ८३ पोती ( १,००० ते १,५०० रु.). भेंडी - ३० पोती ( २,५०० ते ३,५०० रु.),दोडका - २९ पोती ( २,५०० ते ३,५०० रु.). कारली - ३८ डाग ( १,५०० ते ३,५०० रु.). दुधीभोपळा - २६ पोती ( ५०० ते १,२०० रु.),काकडी - २६ पोती ( ५०० ते १,५०० रु.). फरशी - १२ पोती ( २,५०० ते ३,५०० रु.). वालवड - १९ पोती ( २,००० ते ४,००० रु.). गवार - १३ पोती ( ४,००० ते ६,००० रू.), ढोबळी मिरची ४३ डाग ( १,००० ते १,६०० रु.). चवळी - १६ पोती ( २,५००) ते ३,५०० रुपये ), वाटाणा - ४७९ पोती ( १,७०० ते २,२०० रुपये ), शेवगा - ९ पोती ( ३,००० ते ५,००० रुपये ), गाजर - १२२ पोती ( ८०० ते १,२०० रु.).
पालेभाज्या
राजगुरूनगर येथील पालेभाज्यांच्या मुख्य बाजारात मेथीची १ लाख ३० हजार जुड्यांची आवक होऊन मेथीला २५१ ते ९०० रुपये प्रतीशेकडा जुड्यांना भाव मिळाला. कोथिंबीरीची ८० हजार जुड्यांची आवक होऊन प्रतिशेकडा जुड्यांना ५०० ते १,२०० रुपये एवढा भाव मिळाला.शेपूची ८ हजार जुड्यांची आवक होऊन प्रतिशेकडा ७०० ते १,२०० रुपये भाव मिळाला.पालकची काहीही आवक झाली नाही.
चाकण येथील पालेभाज्यांच्या मुख्य बाजारात पालेभाज्यांची एकूण आवक जुड्यांमध्ये व प्रती शेकडा जुड्यांना मिळालेले भाव पुढील प्रमाणे -
मेथी - एकूण ३४ हजार ६२५ जुड्या ( २०० ते ५०० रुपये ), कोथिंबीर - एकूण २८ हजार ५३० जुड्या ( ८०० ते १,००० रुपये ), शेपू - एकुण ३ हजार ४७० जुड्या ( ७०० ते १,००० रुपये ), पालक - एकूण १ हजार १०० जुड्या ( ३०० ते ५०० रुपये ).
जनावरे
चाकण येथील जनावरांच्या बाजारात विक्रीसा ठी आलेल्या १०५ जर्शी गायींपैकी ७५ गाईची विक्री झाली. ( १०,००० ते ४,०००० रुपये ), १४५ बैलांपैकी ९५ बैलांची विक्री झाली.( १०,००० ते ३,०००० रुपये ), १८५ म्हशींपैकी १२५ म्हशींची विक्री झाली. ( १०,००० ते ६,०००० रुपये ), शेळ्या - मेंढ्यांच्या बाजारात विक्रीसाठी आलेल्या ९,३२० शेळ्या - मेंढ्यापैकी ८,८४० मेंढ्यांची विक्री होऊन त्यांना १,५०० ते १२,००० रुपये इतका भाव मिळाला.
२१ चाकण
चाकण बाजारात पालेभाज्यांचा लिलाव