चाकण बाजारात सव्वापाच कोटींची उलाढाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:12 AM2021-01-25T04:12:12+5:302021-01-25T04:12:12+5:30
चाकण : खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये नवीन कांद्याची आवक वाढल्याने भावात मोठी ...
चाकण : खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये नवीन कांद्याची आवक वाढल्याने भावात मोठी घसरण झाली. तळेगाव बटाट्याची आवक वाढल्याने बाजारभावात घट झाली. भुईमूग शेंगांची आवक वाढूनही भावात मोठी वाढ झाली, लसूणाची आवक वाढूनही भाव स्थिर राहिले. वाटाण्याची मोठी आवक झाल्याने भाव घसरले.
कोबी,फ्लॉवर,टोमॅटो,वांगी,भेंडी,कारली,काकडी,दुधी भोपळा दोडक्याच्या आवक घटूनही बाजारभावात घसरण झाली.पालेभाज्यांच्या बाजारात मेथी,कोथिंबीर,शेपू भाजीची आवक वाढल्याने भावात घसरण झाली.जनावरांच्या बाजारात जर्शी गायच्या संख्येत वाढ झाली. तर बैल व म्हैशीच्या संख्येत घट झाली व शेळ्यांमेंढयांच्या संख्येत उच्चांकी वाढ झाली.एकूण उलाढाल ५ कोटी २५ लाख रुपये झाली.
चाकण येथील बाजारात कांद्याची एकूण आवक ८५०० क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक ४००० क्विंटलने वाढल्याने कांद्याचे भावात २०० रुपयांची घसरण झाली.तळेगाव बटाट्याची एकूण आवक १२५० क्विंटल झाली.गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक स्थिर राहूनही बटाट्याच्या भावात ५०० रुपयांची वाढ झाली. बटाट्याचा कमाल भाव १,८०० रुपयांवरून १,४०० हजार रुपयांवर पोहचला.लसणाची एकूण आवक १३ क्विंटल झाली.मागील आठवड्याच्या तुनलेत २ क्विंटलने वाढ होऊनही बाजारभावात १,००० रुपयांवर स्थिरावले .भुईमुग शेंगांची १७ क्विंटल आवक झाल्याने भाव ७,५०० पोहचले.
चाकण बाजारात हिरव्या मिरचीची एकूण आवक १५५ क्विंटल झाली. हिरव्या मिरचीला ३,००० ते ४,००० रुपये असा भाव मिळाला.
शेतीमालाची एकूण आवक व बाजारभाव:
कांदा - एकूण आवक - ८,५०० क्विंटल. भाव क्रमांक १. ३,००० रुपये, भाव क्रमांक २. २,५०० रुपये, भाव क्रमांक ३. २,००० रुपये.
बटाटा - एकूण आवक - १,२५० क्विंटल. भाव क्रमांक १. १,४०० रुपये, भाव क्रमांक २. १,२०० रुपये, भाव क्रमांक ३. ७०० रुपये.
फळभाज्या
चाकण येथील फळभाज्यांच्या बाजारात एकूण आवक डागांमध्ये व प्रती दहा किलोंसाठी डागांना मिळालेले भाव पुढीलप्रमाणे :
टोमॅटो - ४२ पेट्या (२०० ते ५०० रू. ), कोबी - ५२ पोती ( २०० ते ४०० रू. ), फ्लॉवर - ५५ पोती ( ४०० ते ६०० रु.),वांगी - १८ पोती ( २,००० ते ३,००० रु.). भेंडी - १५ पोती (२,००० ते ३,००० रु.),दोडका - १३ पोती (१,५०० ते २,५०० रु.). कारली - १६ डाग (१,५०० ते २,५०० रु.). दुधीभोपळा - १२ पोती (५०० ते १,००० रु.),काकडी - १६ पोती (१,००० ते १,५०० रु.). फरशी १५ - पोती ( १,००० ते २,००० रु.). वालवड - १३ पोती (२,००० ते ४,००० रु.). गवार - ६ पोती (३,००० ते ५,००० रू.), ढोबळी मिरची - २२ डाग (१,००० ते २,००० रु.). चवळी - ४ पोती (१,०००) ते २,००० रुपये ), वाटाणा - ४९० पोती (१,३०० ते १,६०० रुपये), शेवगा - ३ पोती (४,००० ते ६,००० रुपये ), गाजर - १२५ पोती (१,००० ते १,५०० रु.).
* पालेभाज्या –
राजगुरूनगर येथील पालेभाज्यांच्या मुख्य बाजारात मेथीची ७० हजार जुड्यांची आवक होऊन मेथीला ५०० ते १,६०० रुपये प्रतिशेकडा जुड्यांना भाव मिळाला. कोथिंबीरीची ८५ हजार जुड्यांची आवक होऊन प्रतिशेकडा जुड्यांना ३०० ते १,००० रुपये एवढा भाव मिळाला. शेपू ८ हजार जुड्यांची आवक होऊन, शेपूला २०० ते ५०१ रुपये प्रतिशेकडा भाव मिळाला.
चाकण येथील पालेभाज्यांच्या मुख्य बाजारात पालेभाज्यांची एकूण आवक जुड्यांमध्ये व प्रती शेकडा जुड्यांना मिळालेले भाव पुढील प्रमाणे -
मेथी - एकूण १६ हजार ५६० जुड्या ( ६०० ते १,००० रुपये ), कोथिंबीर - एकूण २८ हजार ९५० जुड्या ( ३०० ते ६०० रुपये ), शेपू - एकुण ४ हजार ९६० जुड्या (३०० ते ६०० रुपये ), पालक - एकूण ३ हजार ६५० जुड्या (३०० ते ५०० रुपये).
जनावरे
चाकण येथील जनावरांच्या बाजारात विक्रीसाठी आलेल्या ६० जर्शी गायींपैकी २५ गाईची विक्री झाली. (१०,००० ते ४,०००० रुपये), १२० बैलांपैकी ९० बैलांची विक्री झाली. (१०,००० ते ३,०००० रुपये), १६० म्हशींपैकी १२२ म्हशींची विक्री झाली. (१०,००० ते ६,०००० रुपये), शेळ्या-मेंढ्यांच्या बाजारात विक्रीसाठी आलेल्या १०,५३० शेळ्या-मेंढ्यांपैकी ९८१० मेंढ्यांची विक्री होऊन त्यांना १,५०० ते १२,००० रुपये इतका भाव मिळाला.
२४ चाकण
चाकण बाजारात गाजराची मोठी आवक झाली.