तुषार जगताप यांची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 04:10 AM2021-09-18T04:10:51+5:302021-09-18T04:10:51+5:30
उंडवडी कडेपठार: ग्लोबल टेक्नॉलॉजी स्किल डेव्हलपमेंट चॅरिटेबल ट्रस्ट व भारतीय युवा शक्ती ट्रस्ट पुणे यांच्यामध्ये सामंजस्य करार नुकताच हडपसर ...
उंडवडी कडेपठार: ग्लोबल टेक्नॉलॉजी स्किल डेव्हलपमेंट चॅरिटेबल ट्रस्ट व भारतीय युवा शक्ती ट्रस्ट पुणे यांच्यामध्ये सामंजस्य करार नुकताच हडपसर येथे संपन्न झाला. या कार्यक्रमात येथील तुषार जगताप यांची भारतीय युवा शक्ती ट्रस्ट या संस्थेत बिझनेस गुरू (मेंटॉर) म्हणून निवड करण्यात आली.
त्या निवडीचे पत्र त्यांना देण्यात आले, तसेच भारतीय युवा शक्ती ट्रस्ट हडपसर पुणे ही संस्था उद्योजक घडवण्याचे कार्य करते, तसेच नवीन होतकरू तरुण- तरुणींना स्वत:चा व्यवसाय उभारण्यात सर्व मदत नि:शुल्क करत असते. जगताप हे तरुणांनी उद्योजक व्हावे म्हणून संस्थेच्या माध्यमातून काम करत असतात. त्यांच्या या कामाची दखल घेऊन भारतीय युवा शक्ती ट्रस्ट या संस्थेने त्यांच्या संस्थेबरोबर सामंजस्य करार केला आहे. सामंजस्य कराराची एकमेकांबरोबर देवाण-घेवाण करण्यात आली. यावेळी संस्थेचे मान्यवर उपस्थित होते.
——————————————————
तुषार जगताप यांची भारतीय युवा शक्ती ट्रस्ट या संस्थेच्या मेंटॉर पॅनलवर निवड करण्यात आली.
१७०९२०२१ बारामती—०२