बारावीच्या विद्यार्थ्यांना ३ एप्रिलपासून मिळणार हॉल तिकीट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 04:11 AM2021-04-02T04:11:12+5:302021-04-02T04:11:12+5:30

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे एप्रिल-मे २०२१ मध्ये घेतल्या जाणाऱ्या बारावीच्या परीक्षेचे प्रवेश ...

Twelfth grade students will get hall tickets from April 3 | बारावीच्या विद्यार्थ्यांना ३ एप्रिलपासून मिळणार हॉल तिकीट

बारावीच्या विद्यार्थ्यांना ३ एप्रिलपासून मिळणार हॉल तिकीट

Next

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे एप्रिल-मे २०२१ मध्ये घेतल्या जाणाऱ्या बारावीच्या परीक्षेचे प्रवेश पत्र (हॉल तिकीट) येत्या ३ एप्रिलपासून राज्य मंडळाच्या संकेतस्थळावरून डाऊनलोड करून घेता येणार आहे. सर्व माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना ऑनलाइन प्रवेशपत्राची प्रत प्रिंट काढून द्यावी. त्यासाठी कोणतेही वेगळे शुल्क आकारू नये, अशा स्पष्ट सूचना राज्य मंडळातर्फे देण्यात आले आहेत.

राज्य मंडळातर्फे बारावीच्या परीक्षा येत्या २३ एप्रिलपासून सुरू होणार आहेत. या परीक्षांसाठी प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांचे प्रवेशपत्र ऑनलाइन पद्धतीने उपलब्ध करून दिले जाणार आहे. सर्व विभागीय मंडळांच्या कार्यक्षेत्रातील सर्व माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना प्रवेश पत्राची ऑनलाईन प्रिंट काढून द्यायची आहे. तसेच विद्यार्थ्यांनी या प्रिंट आउटवर मुख्याध्यापक किंवा प्राचार्यांची स्वाक्षरी व शिक्का घेणे आवश्यक आहे.

प्रवेशपत्रामध्ये विषय व माध्यम बदल असतील तर त्याच्या दुरुस्त्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांनी विभागीय मंडळात जाऊन करून घ्यावयाच्या आहेत. त्याचप्रमाणे हॉल तिकीट वरील फोटो, स्वाक्षरी, विद्यार्थ्याचे नाव या संदर्भातील दुरुस्त्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांनी त्यांच्या स्तरावर करून त्याची एक प्रत विभागीय मंडळाकडे पाठवायची आहे. एखाद्या विद्यार्थ्याकडून हॉल तिकीट गहाळ झाल्यास त्याला पुन:श्च प्रिंटआउट काढून त्यावर लाल शाईने द्वितीय प्रत असा शेरा देऊन हॉल तिकीट द्यायचे आहे. फोटो सदोष असल्यास त्यावर विद्यार्थ्याचा फोटो चिकटवून संबंधित मुख्याध्यापक किंवा प्राचार्यांनी त्यावर शिक्का मारून स्वाक्षरी करायची आहे, असे राज्य मंडळातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

Web Title: Twelfth grade students will get hall tickets from April 3

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.