बारा दिवस उलटूनही फरारी आरोपी लागेना पोलिसांच्या हाती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:16 AM2021-03-04T04:16:42+5:302021-03-04T04:16:42+5:30

आरोपी पोलीस कोठडीतून गज कापून पलायन करतात ही घटना अनेकदा चित्रपटात पाहायला मिळते. पण, भोरमध्ये १२ दिवासांपूर्वी अशीच एक ...

Twelve days later, the fugitive accused was not caught by the police | बारा दिवस उलटूनही फरारी आरोपी लागेना पोलिसांच्या हाती

बारा दिवस उलटूनही फरारी आरोपी लागेना पोलिसांच्या हाती

Next

आरोपी पोलीस कोठडीतून गज कापून पलायन करतात ही घटना अनेकदा चित्रपटात पाहायला मिळते. पण, भोरमध्ये १२ दिवासांपूर्वी अशीच एक धक्कादायक घटना उघडकीस आली होती. दोन आरोपींनी फिल्मी स्टाईलने पोलीस ठाण्याच्या कोठडीतून पळ काढला आहे. यामुळे राजगड पोलिसांच्या कामकाजाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थिती केले जात आहे. चंद्रकांत लक्ष्मण लोखंडे (वय ३२, रा. मु. पो. ढवळ, ता. फलटण, जि. सातारा) व प्रवीण प्रल्हाद राऊत ( वय ३२ रा. चिखली, ता. इंदापूर, जि. पुणे) अशी पलायन केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्यावर दरोड्यास १४ गुन्हे दाखल आहेत. पोलीस पकडायला गेले असताना चंद्रकांत लोखंडेने पोलिसांवरच गोळीबार केला होता. तर प्रवीण राऊत हा यापूर्वी जेलमधून पळून गेला होता. दोघेही रेकाॅर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर मोका लावलेला आहे.

राजगड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार : पुणे-सातारा महामार्गावरील कापूरव्होळ (ता. भोर) येथे पोलिसांच्या वेशात येऊन गोळीबार करून दहशत निर्माण करत फिल्मी स्टाईलने ज्वेलर्सवर आरोपीनी दरोडा टाकला होता. त्यानंतर आरोपी चारचाकी गाडीतून पळून गेले होते. आरोपींचा शोध घेत असताना आरोपींनी पोलिसांवर गोळीबार केला होता. यात एक अधिकारी जखमी झाले होते. राजगड पोलिसांनी काही दिवसांपूर्वी वरील आरोपींना ताब्यात घेतले होते. ९ फेबुवारीपासून १७ पर्यंत सर्व आरोपींची भोर पोलीस ठाण्याच्या कोठडीत रवानगी करण्यात आली होती. मात्र, त्यांनी १७ फेब्रुवारी पहाटे लोखंडी गज हॅक्साॅब्लेडने कापून पलायण केले आहे. या घटनेला आता १२ दिवस झाले. मात्र, अद्यापही हे आरोपी पोलिसांना गुंगारा देत आहेत.

Web Title: Twelve days later, the fugitive accused was not caught by the police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.