यशवंतराव महोत्सवात दिवेतील बारा शाळा

By admin | Published: December 22, 2016 11:56 PM2016-12-22T23:56:34+5:302016-12-22T23:56:34+5:30

यशवंतराव चव्हाण कला-क्रीडा महोत्सवांतर्गत दिवे केंद्रातील १२ शाळांमधील विद्यार्थ्यांच्या विविध स्पर्धा केंद्रप्रमुख प्रताप मेमाणे

Twelve schools in the Yashwantrao festival | यशवंतराव महोत्सवात दिवेतील बारा शाळा

यशवंतराव महोत्सवात दिवेतील बारा शाळा

Next

गराडे : यशवंतराव चव्हाण कला-क्रीडा महोत्सवांतर्गत दिवे केंद्रातील १२ शाळांमधील विद्यार्थ्यांच्या विविध स्पर्धा केंद्रप्रमुख प्रताप मेमाणे यांच्या मार्गदर्शनाखाली कातोबा हायस्कूल दिवे (ता. पुरंदर) येथे उत्साहात झाल्या. कातोबा माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक शंकर जगदाळे यांच्या हस्ते क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन करण्यात आले.
या वेळी केंद्रप्रमुख प्रताप मेमाणे, शिक्षकनेते तानाजी फडतरे, सुनील लोणकर, महेश वाघमारे, अशोक खेंगरे, राजश्री मोरे, सविता चव्हाण, विद्या वाघमारे, शारदा चव्हाण सुलोचना ढुमे, जया कोल्हे, शुभांगी मेढेकर, मनीषा सुरवसे, वंदना हुंदरे, सुवर्णा कुंजीर, सविता जगताप, किरण गुरव, विद्या मेमाणे, शैलजा गादे, सुजाता मेमाणे, अरुणा बोबडे, संगीता कुदळे, रूपाली माने, स्वरूपा दीक्षित, स्वाती लिगाडे, विद्या पवार, कुसुम कामथे, ज्योती जगताप इत्यादींनी स्पर्धा यशस्वी होण्यासाठी सहकार्य केले.
स्पर्धाप्रकार व विजेते पुढीलप्रमाणे (कंसात शाळा) : ५० मीटर धावणे (लहान गट) : मुले- प्रथम- प्रणव बाळासाहेब भापकर (अंबऋषी), द्वितीय- प्रणव निवृत्ती झेंडे (चिंचावले), तृतीय- विराज बाळासाहेब शेंडकर (पवारवाडी) मुली- प्रथम अनुष्का ज्ञानेश्वर झेंडे (चिंचावले), द्वितीय- यशस्वी दिगंबर काळे (सोनोरी), तृतीय- हिंदवी अविनाश पवार (पठारवाडी)
१०० मीटर धावणे (मोठा गट) मुले- प्रथम- मनोज जयवंत गवाले (सोनोरी), द्वितीय- नागनाथ उत्तम गायकवाड (काळेवाडी), तृतीय- आकाश राजेंद्र भोरडे (झेंडेवाडी). प्रथम- दिव्या रामदास काळे (सोनोरी) द्वितीय- समीक्षा मोहन काळे (काळेवाडी), तृतीय- सायली राजेंद्र गोरगल (झेंडेवाडी).
चेंडूफेक (लहान गट)- मुले- प्रथम- गणराज गोरख झेंडे (झेंडेवाडी), द्वितीय- प्रणव निवृत्ती झेंडे (चिंचावले), तृतीय- शुभम सत्यवान पवार (उदाचीवाडी). मुली- यशस्वी दिगंबर काळे (सोनोरी), द्वितीय- स्नेहल संतोष भिसे (जाधववाडी), तृतीय- अनुष्का महेश झेंडे (चिंचावले). उभी उंच उडी (लहान गट)- मुले- प्रथम- विराज गणेश झेंडे (चिंचावले), द्वितीय- अथर्व तानाजी भापकर (अंबऋषी), यश राजेंद्र कुंभार (उदाचीवाडी), तृतीय- युवराज संदीप गांगुर्डे (जाधववाडी), प्रवीण संग्राम गवलवाड (काळेवाडी). मुली- प्रथम- काजल झेंडे (झेंडेवाडी), द्वितीय- सिद्धी कुंभारकर (उदाचीवाडी), तृतीय- नयन राजेंद्र गाडे (दिवे), संस्कृती गोरख झेंडे (चिंचावले).

Web Title: Twelve schools in the Yashwantrao festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.