श्रुतीच्या खुनाच्या शोधासाठी बारा पथके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2017 01:20 AM2017-10-24T01:20:58+5:302017-10-24T01:21:46+5:30

पुणे : घरामधून अपहरण करून लैंगिक अत्याचारानंतर खून करण्यात आलेल्या चिमुकलीच्या मारेक-याला शोधण्यासाठी पोलीस जंग जंग पछाडत आहेत.

Twelve squads for searching the murder of Shruti | श्रुतीच्या खुनाच्या शोधासाठी बारा पथके

श्रुतीच्या खुनाच्या शोधासाठी बारा पथके

Next

पुणे : घरामधून अपहरण करून लैंगिक अत्याचारानंतर खून करण्यात आलेल्या चिमुकलीच्या मारेक-याला शोधण्यासाठी पोलीस जंग जंग पछाडत आहेत. पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्या सूचनांवरून तब्बल बारा पथके नेमण्यात आली आहेत. यामध्ये परिमंडल दोनसह गुन्हे शाखेच्या विविध पथकांचा समावेश असल्याची माहिती उपायुक्त डॉ. प्रवीण मुंढे यांनी दिली. दरम्यान, गुन्ह्यासंदर्भात काही धागेदोरे मिळाले असून त्यादृष्टीने तपास सुरू आहे. मात्र, पोलीस कोणत्याही निष्कर्षाप्रत आलेले नाहीत.
श्रुती विजय शिवगणे (वय अडीच वर्षे) या चिमुकलीचा रविवारी मध्यरात्री साडेबारा ते सकाळी साडेसहाच्यादरम्यान घरामधून अपहरण करून खून करण्यात आला. तिचा मृतदेह सिंहगड रस्त्यावरील प्रयेजा सिटी सोसायटीच्या मागील मोकळ्या जागेत मिळून आला होता. दरम्यान, तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचे शवविच्छेदन अहवालामधून समोर आले.
घटनास्थळावर आढळून आलेला श्रुतीचा मृतदेह आणि एकूणच वातावरण हृदयद्रावक होते. श्रुती रविवारी रात्री घरामधून गायब झाल्यापासून ६० पोलीस अधिकारी आणि कर्मचारी तिचा रात्रभर शोध घेत होते. रविवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास तिचा मृतदेह आढळून आल्यानंतर तिचा खून झाल्याचे निष्पन्न झाले.
याप्रकरणी वडील विजय शिवराज शिवगणे (वय ३२, रा. लगडमळा, वडगाव धायरी) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी
अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
मूळचे परभणीचे असलेले शिवगणे कुटुंबीय दोन महिन्यांपूर्वी पोटाची खळगी भरण्यासाठी पुण्यात आले होते. विजय वेटरचे काम करतात, तर श्रुतीची आई विद्या या भाज्या विकण्याचे काम करतात. या कुटुंबावर मोठा आघात झाला आहे. पोलीसही या कुटुंबाचे दु:ख पाहून हेलावून गेले आहेत.
घटनास्थळावरील हृदयद्रावक चित्र पाहून पोलीस अधिकाºयांनाही अश्रू आवरले नाहीत. श्रुती गायब झाली त्या रात्रीपासून पोलीस आरोपीचा कसून शोध घेत आहेत. रविवारी आणि सोमवारी दिवसभर जवळपास सव्वादोनशे पोलीस कर्मचारी आणि अधिकारी या तपासाला लागले आहेत. काही संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेऊन कसून चौकशी करायला सुरुवात केली आहे. रविवारी दिवसभरामध्ये २५ जणांकडे चौकशी करण्यात आली असून सोमवारीही १५ पेक्षा अधिक संशयितांकडे चौकशी सुरू होती. दरम्यान, हा गुन्हा जवळच्याच कोणीतरी केल्याचाही दाट संशय पोलिसांना असून त्यादृष्टीने बारकाईने तपास सुरू आहे. एकूणच घटना अत्यंत संवेदनशील असल्यामुळे पोलीसही जबाबदारीपूर्वक आणि काळजीने हे प्रकरण हाताळत आहेत.
>घटनास्थळाचा परिसर पिंजून काढला
सोमवारी पोलीस सहआयुक्त रवींद्र कदम, अतिरिक्त आयुक्त (दक्षिण विभाग) रवींद्र सेनगावकर, प्रदीप देशपांडे (गुन्हे) उपायुक्त डॉ. प्रवीण मुंढे, पंकज डहाणे (गुन्हे), सहायक आयुक्त शिवाजी पवार, गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त सुरेश भोसले यांच्यासह विविध पोलीस ठाणी आणि गुन्हे शाखेच्या पोलीस अधिकाºयांनी घटनास्थळाच्या आसपासचा परिसर पोलीस कर्मचाºयांच्या मदतीने पिंजून काढला.
खुन्याचा माग काढण्यासाठी काही धागेदोरे हाती लागतात का, हे बारकाईने तपासण्यात येत आहे. पोलीस अद्याप कोणत्याही निष्कर्षाप्रत आलेले नसून आरोपीला पकडल्यानंतरच घटनेमागील नेमके कारण, आरोपीची मन:स्थिती याबाबतचा उलगडा होऊ शकणार आहे. आरोपीला लवकरात लवकर अटक करुन कडक शासन करावे, अशी मागणी विविध स्तरांमधून जोर धरू लागली आहे.

Web Title: Twelve squads for searching the murder of Shruti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस