बारावर्षीय सोहमच्या संशोधनाची पाच वर्ल्ड रेकॉर्डस संस्थांमध्ये नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:15 AM2021-06-16T04:15:00+5:302021-06-16T04:15:00+5:30

-- तळेगाव ढमढेरे : जगातील सर्वांत कमी वजनाचे (२५ ते ८० ग्रॅम) शंभर उपग्रह बनवून आकाशात सोडण्याचे प्रयोग यशस्वी ...

Twelve-year-old Soham's research is recorded in five World Records institutes | बारावर्षीय सोहमच्या संशोधनाची पाच वर्ल्ड रेकॉर्डस संस्थांमध्ये नोंद

बारावर्षीय सोहमच्या संशोधनाची पाच वर्ल्ड रेकॉर्डस संस्थांमध्ये नोंद

Next

--

तळेगाव ढमढेरे : जगातील सर्वांत कमी वजनाचे (२५ ते ८० ग्रॅम) शंभर उपग्रह बनवून आकाशात सोडण्याचे प्रयोग यशस्वी केल्याबद्दल तळेगाव ढमढेरे येथील जिल्हा परिषदेतील बारावर्षीय विद्यार्थी सोहम पंडित यांनी विश्वविक्रमी नोंद केली आहे. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसह जगातील विक्रमांची नोंद करणाऱ्या देशातील पाच संस्थांनी सोहमच्या या संशोधनाची नोंद केली आहे

तमिळनाडू येथे डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाउंडेशन व स्पेस इंडिया यांच्या वतीने आयोजित स्पेस रिसर्च चॅलेंज-२०२१ या उपक्रमांतर्गत कमी वजनाचे १०० उपग्रह बनवून अवकाशात सोडण्याच्या उपक्रमात सोहमने सहभाग घेतला. तळेगाव ढमढेरे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शिक्षिका माधुरी शेजवळ यांच्या मार्गदर्शनाखाली सोहम सागर पंडित याने सहभाग घेतला होता, तर या उपक्रमांतर्गत जगातील सर्वांत कमी वजनाचे २५ ते ८० ग्रॅम वजन असणारे १०० उपग्रह बनवून त्यांना ३५ ते ३८ हजार मीटर उंचीवर सायंटिफिक हेलियम बलूनद्वारे प्रक्षेपित करण्यात आले. या उपग्रहामुळे हवेतील आद्रता, हवेतील प्रदूषण, तापमान, हवेतील वायूंचे प्रमाण हवेतील प्रदूषणामुळे ओझोन वायूची होणारी हानी याची माहिती मिळणार आहे, त्याचा मोठा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे.

सोहम पंडित या चिमुरड्याने आपले कौशल्य दाखविल्याने त्याचे सर्वत्र कौतुक होत असताना आता त्याच्या कार्याची दखल घेऊन नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड, वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड लंडन, असिस्टंट वर्ल्ड रेकॉर्ड, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड, आशिया बुक ऑफ रेकॉर्ड यामध्ये झाली असून, याबाबतचे प्रमाणपत्रदेखील सोहम पंडित याला देण्यात आलेले असून, सोहमच्या अनोख्या कार्यामुळे सोहम हा शिरूर तालुक्याचे नाव इतर देशांमध्ये पोहोचविणारा सर्वांत कमी वयाचा अवलिया ठरला आहे.

--

चौकट

सोहमच्या फोटोचे येणार पोस्ट तिकीट

--

तळेगाव ढमढेरे येथील सोहम सागर पंडित सहभागी झालेल्या या उपक्रमाची अनेक ठिकाणी नोंद झालेली असतानाच आता भारत सरकारकडून पोस्ट तिकिटावर सोहमचा फोटो छापला जाणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. कोरोनाकाळ संपताच एका छोटेखानी कार्यक्रमात पोस्ट तिकिटाचे प्रकाशन होईल व ते तिकीट व्यवहारात आणले जाणार आहे. याबाबतचे पत्रदेखील सोहम पंडित यांच्या कुटुंबीयांना देण्यात आले आहे.

Web Title: Twelve-year-old Soham's research is recorded in five World Records institutes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.