सात वर्षाच्या मुलीवर आत्याचार करणाऱ्या नराधमास बारा वर्षाची सक्तमजुरी...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2023 09:20 AM2023-11-30T09:20:16+5:302023-11-30T09:20:38+5:30

नराधमाने त्याच्या नातेवाईकाच्या शेजारी राहणाऱ्या एका सात वर्षीय मुलीला कशाचे तरी आमिष दाखवून बिल्डिंगच्या टेरेसवर नेले होते

Twelve years of hard labor for the murderer who raped a seven-year-old girl... | सात वर्षाच्या मुलीवर आत्याचार करणाऱ्या नराधमास बारा वर्षाची सक्तमजुरी...

सात वर्षाच्या मुलीवर आत्याचार करणाऱ्या नराधमास बारा वर्षाची सक्तमजुरी...

राजगुरुनगर: चाकण येथे सात वर्षाच्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधमास राजगुरूनगर येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाच्या विशेष न्यायाधीशांनी १२ वर्षे सक्तमजुरी व १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. सुरेंद्र कैलास वर्मा (वय २२ रा .(कुरुळी) चाकण मुळगाव कंपू, ग्वाल्हेर, मध्यप्रदेश )असे शिक्षा झालेल्या नराधमाचे नाव आहे. 
          
या खटल्याची माहिती अशी, दि ७ जुलै २०१५ रोजी सकाळी ८ ते दुपारी १२ वाजण्यापूर्वी चाकण (कुरुळी) येथे ही घटना घडली. पाहुण्यांकडे आलेल्या सुरेंद्र वर्मा या नराधमाने त्याच्या नातेवाईकाच्या शेजारी राहणाऱ्या एका सात वर्षीय मुलीला कशाचे तरी आमिष दाखवून बिल्डिंगच्या टेरेसवर नेले. तेथे त्याने लहान सात वर्षे वयाच्या मुलीवर पाशवी अत्याचार केला. पीडित मुलगी सकाळीपासून घरी न परतल्याने तिच्या आईवडील व नातेवाईक शेजारी यांनी शोध घेतला. शोध घेत असताना टेरेसवर गेले असता सुरेंद्र वर्मा हा त्या लहान मुलीसोबत वाईट कृत्य करीत होता. 
             
हा खटला राजगुरूनगर येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचे विशेष न्यायालयातील न्यायाधीश एस पी पोळ यांच्या पुढे सुरु होता. या खटल्यात आरोपीला शिक्षा ठोठावण्यात आली. १२ वर्षे सक्त मजुरी व १० हजार दंड, दंड न भरल्यास ३ महिने  साधा कारावासाची शिक्षा ठोठावली. दंडाची रक्कम रुपये २० हजार पीडित मुलीचा देण्याचा आदेश कोर्टाने दिला. या खटल्याचे न्यायालयीन पोलीस कामकाज योगिता गावडे यांनी केले.

Web Title: Twelve years of hard labor for the murderer who raped a seven-year-old girl...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.