विशेष मुलांना अडीच कोटींची मदत

By admin | Published: January 25, 2016 12:54 AM2016-01-25T00:54:41+5:302016-01-25T00:54:41+5:30

हापालिकेच्या नागरवस्ती विकास योजना विभागामार्फत अपंग कल्याणकारी योजनेंतर्गत महापालिका हद्दीतील विशेष (मतिमंद) मुलांचा, व्यक्तींचा सांभाळ

Twenty-five crore aid to special children | विशेष मुलांना अडीच कोटींची मदत

विशेष मुलांना अडीच कोटींची मदत

Next

 पिंपरी : महापालिकेच्या नागरवस्ती विकास योजना विभागामार्फत अपंग कल्याणकारी योजनेंतर्गत महापालिका हद्दीतील विशेष (मतिमंद) मुलांचा, व्यक्तींचा सांभाळ करणाऱ्या महापालिका हद्दीतील नोंदणीकृत स्वयंसेवी संस्थेस अथवा मतिमंद व्यक्तीच्या पालकास वर्षभर अर्थसाहाय्य दिले जाते. १०५७ लाभार्थींना २ कोटी ५३ लाख ६८ हजार रुपये अर्थसाहाय्य देण्यात येणार आहे, अशी माहिती आयुक्त राजीव जाधव यांनी दिली.
नागरवस्ती विकास योजना विभागामार्फत विविध योजना राबविल्या जातात. अनुदाना संदर्भातील विषयास आयुक्तांनी मंजुरी दिली आहे. समाज विकास अधिकारी तथा माहिती अधिकारी संभाजी ऐवले म्हणाले, ‘‘१०५७ विशेष (मतिमंद) लाभार्थ्यांना मदत देण्यात येणार आहे. प्रत्येकी प्रतिमहा रक्कम रुपये दोन हजार याप्रमाणे पहिल्या सहा महिन्यांकरिता १२ हजार रुपये पहिला हप्ता आणि दुसऱ्या सहा महिन्यांकरिता १२ हजार याप्रमाणे वार्षिक २४ हजार रुपये अर्थसाहाय्य देण्यात येणार आहे. प्राप्त लाभार्थींना अर्थसाहाय्याची रक्कम पालकांच्या नावे धनादेशाद्वारे देण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Twenty-five crore aid to special children

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.