चोवीस तास पाणी कधी?

By admin | Published: May 31, 2016 02:04 AM2016-05-31T02:04:54+5:302016-05-31T02:04:54+5:30

उद्योगनगरी असणाऱ्या पिंपरी-चिंचवड शहराची २०४१ची लोकसंख्या गृहीत धरून पाण्याचे नियोजन महापालिकेने केले. मात्र, पवना धरणातून पाणी आणण्यास शेतकऱ्यांनी खोडा घातल्याने

Twenty-four hours water ever? | चोवीस तास पाणी कधी?

चोवीस तास पाणी कधी?

Next

पिंपरी : उद्योगनगरी असणाऱ्या पिंपरी-चिंचवड शहराची २०४१ची लोकसंख्या गृहीत धरून पाण्याचे नियोजन महापालिकेने केले. मात्र, पवना धरणातून पाणी आणण्यास शेतकऱ्यांनी खोडा घातल्याने, तसेच भामा-आसखेड, आंध्रा धरणामधून दोनशे दलघमी पाणी आणण्याचे नियोजन अद्यापही कागदोपत्रीच असल्याने चोवीस तास पाणीपुरवठ्याचे स्वप्न पूर्ण कधी होणार आहे?
केंद्र शासनाच्या वतीने सार्वजनिक सुविधा सक्षमीकरण, सुविधांचे सेवा पातळ्यांचे मानांकन निश्चित करण्याचे धोरण आखले गेले. त्यानुसार पुण्यापाठोपाठ जवाहरलाल नेहरू नागरी पुनर्निर्माण योजनेत (जेएनएनयूआरएम) पिंपरी-चिंचवड शहरातील पिण्याच्या पाण्याचे नियोजन केले. त्यातून २४ तास पाणी पुरविण्याचे उद्दिष्ट होते. त्यानुसार पवना धरणातून बंदिस्त जलवाहिनीद्वारे पाणी आणण्याची योजना पुढे आली. शहराची २०४१ची लोकसंख्या गृहीत धरून पाण्याचे नियोजन तत्कालीन आयुक्त दिलीप बंड यांनी केले. शहरास ३७८ दशलक्ष लिटर पाणी आवश्यक होते. त्यानुसार २००८मध्ये बंदिस्त जलवाहिनीचा प्रकल्प आराखडा तयार झाला. गेल्या आठ वर्षांत हा आराखडा पूर्ण झालेला नाही. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचेही दुर्भिक्षही शहरवासीयांना अनुभवायला मिळत आहे.
शहरात कुटुंबांची एकूण संख्या ४ लाख ३० हजार आहे. प्रतिमाणशी प्रतिदिन १८० लिटर पाणी पुरविले जाते. त्यामुळे दिवसाला ३१ कोटी १२ लाख ९१ हजार १०० लिटर पाणी आवश्यक आहे. त्यामुळे भविष्यात पाण्याचे नियोजन काळाची गरज आहे. केलेले नियोजन अंमलात आणण्याची गरज आहे.
बंदिस्त जलवाहिनी झाल्यास शेतीला पाणी मिळणार नाही, अशी भावना झाल्याने मावळातील शेतकऱ्यांनी विरोध केला. आंदोलनात तीन शेतकरी शहीद झाले. शेतकऱ्यांची बाजू समजून न घेतल्याने आंदोलनास हिंसक वळण मिळाले.
पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेने भामा आसखेड, आंद्रा धरणामधून बंदिस्त जलवाहिनीद्वारे पाणी आणण्याचे नियोजन केले आहे. आंध्रा धरणातून चाळीस दलघमीचा प्रस्ताव जलसंपदा विभागाकडे पाठविला आहे. मावळसारखाच विरोध या भागातही होऊ लागला आहे. शेतीचे पाणी नेऊ नका, अशी मागणी होत आहे. शेतकऱ्यांनी सर्वेक्षण नुकतेच बंद पाडले. तसेच यासाठी अडीचशे कोटी सरकारने माफ करावे, अशी मागणी महापालिकेने केली आहे.
यमुनानगर, निगडी परिसरात चोवीस तास पाण्याच्या नियोजनाचा प्रयोग २०१२-१३मध्ये राबविण्यात आला. या भागातील सुमारे पंधरा हजार नळजोडांसाठी ही
योजना राबविण्यात आली. मात्र, गेल्या चार वर्षांत शहरात २४ तास पाणी तर दूरच. मात्र, एक वेळही पुरसे पाणी देण्यात महापालिकेला यश आलेले नाही. (प्रतिनिधी)

Web Title: Twenty-four hours water ever?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.