हनी ट्रॅपमधून तरुणाला वीस लाखांचा गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2021 04:14 AM2021-08-21T04:14:17+5:302021-08-21T04:14:17+5:30

लोणी काळभोर : इन्स्टाग्रामद्वारे ओळख झालेल्या मांजरी येथील तरुणास उरुळी कांचन येथे बोलावले. तेथे हनी ट्रॅपचा वापर करून तरुणीने ...

Twenty lakh gangster to young man from Honey Trap | हनी ट्रॅपमधून तरुणाला वीस लाखांचा गंडा

हनी ट्रॅपमधून तरुणाला वीस लाखांचा गंडा

Next

लोणी काळभोर : इन्स्टाग्रामद्वारे ओळख झालेल्या मांजरी येथील तरुणास उरुळी कांचन येथे बोलावले. तेथे हनी ट्रॅपचा वापर करून तरुणीने त्याच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतर तिने साथीदारांच्या मदतीने धमकी देऊन, त्याला ब्लॅकमेल करीत त्याच्याकडे ५० लाखांची खंडणी मागितली. तडजोडीअंती त्याच्याकडून २० लाख रुपये घेतल्याप्रकरणी तरुणीसह एकून १२ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या टोळीने पनवेल येथील व्यावसायिकाला अशाच प्रकारे लुबाडल्याचे सिद्ध झाल्याने कोंढवा पोलिसांनी तरुणी व तिच्या साथीदारांना अटक केली आहे.

नर्सरी व्यावसायिक तरुणाने दिलेल्या फिर्यादीवरून रोहिणी भातुलकर (वय २५, पूर्ण नाव पत्ता माहीत नाही ) हिचेसह तिचा भाऊ असे सांगणारा इसम व त्यांचे सोबत असणारे ३ अनोळखी साथीदार, तौफिक शेख (वय २८, पूर्ण नाव पत्ता माहीत नाही), मंगेश कानकाटे (वय २८), शुभम कानकाटे (वय २८), साईराज कानकाटे (वय १९, तिघेही रा. इनामदारवस्ती, कोरेगावमूळ, ता. हवेली), ऋतुराज कांचन (वय २०), बंटी आमले (वय २०, दोघे रा. उरुळी कांचन), प्रतीक लांडगे (वय १९, रा. लोणी काळभोर) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, या हनी ट्रॅपमध्ये अडकवण्यात आलेला २० वर्षीय तरुण नर्सरीचा व्यवसाय करतो. त्याचे मामा उरुळी कांचन येथे राहणेस असल्याने त्याची साईराज, ऋतुराज, शुभम, मंगेश यांचेबरोबर ओळख होती. १५ ऑक्टोबर रोजी त्याच्या इन्स्टाग्रामवर रोहिणी भातुलकर या नावाने हाय असा मेसेज आला. खात्यावरील डीपीवर एका मुलीचा फोटो होता. त्याने तिच्यासोबत चॅट केल्यावर त्या मुलीनेही रिप्लाय करताना मी तुला ओळखते असे सांगत संवाद वाढविला. त्यानंतर त्याला भेटण्यासाठी विचारले व १७ तारखेला उरुळी कांचन येथे भेटायचे ठरले. १७ तारखेला रात्री दहाच्या सुमारास उरुळी कांचन येथील शिंदवणे रस्त्यावर ते भेटले. त्यांना लॉजमध्ये घेतले नाही म्हणून त्यांच्या राहण्याची व्यवस्था ऋतुराज याने एका मोबाईल कंपनीच्या ऑफिसमध्ये केली. तरुणीने त्याला जबरदस्तीने शरीरसंबंध प्रस्थापित करण्यास भाग पाडले. त्यानंतर शेख व इतरांना तिने बोलावून घेतले. सर्वांनी मारहाण करुन त्याच्या पाकिटातील ३ हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले. त्यानंतर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची भीती दाखवून त्याला जबरदस्तीने गाडीत घालून यवत पोलीस ठाण्यासमोर नेले. त्यानंतर इतरांशी संपर्क करण्यास सांगितले. त्यानंतर उरुळी कांचन येथे परत आणून त्याचे मामा व काकास बोलावून, प्रकरण मिटवायचे असेल तर त्यांना ५० लाख रुपये द्यावे लागतील, नाहीतर बलात्काराचा गुन्हा दाखल करुन जेलमध्ये पाठवतो अशी धमकी दिली. त्यानंतर चर्चा करुन मध्यस्थी करुन ५० लाख रुपयेऐवजी २० लाख रुपये घेऊन तडजोड करण्यास सांगितले. ठरल्याप्रमाणे सकाळी १० वाजण्याच्या सुमारास सर्वांसमोर मंगेश कानकाटे यांचे ऑफिसमध्ये २० लाख रुपये दिले. त्यानंतर सदर तरुणास सोडले व त्या वेळी सर्वजण घाबरलेले असल्याने व तक्रार दिली तर समाजामध्ये नाचक्की होईल या भीतीने झाले प्रकाराबाबत कोठेही तक्रार केली नव्हती. परंतु कोंढवा पोलिसांनी या टोळीला अटक केल्याची माहिती मिळाल्यावर त्यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

Web Title: Twenty lakh gangster to young man from Honey Trap

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.