चोरीस गेलेले आजीचे दागिने वीस महिन्यांनी पुन्हा मिळाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 04:12 AM2021-09-18T04:12:06+5:302021-09-18T04:12:06+5:30

याबाबतची माहिती अशी की, शिक्रापूर येथील सिद्धार्थनगर येथे राहणाऱ्या दमयंती खुटे या आजी २७ नोव्हेंबर २०१९ रोजी एका ...

Twenty months later, the stolen grandmother's jewelry was recovered | चोरीस गेलेले आजीचे दागिने वीस महिन्यांनी पुन्हा मिळाले

चोरीस गेलेले आजीचे दागिने वीस महिन्यांनी पुन्हा मिळाले

Next

याबाबतची माहिती अशी की, शिक्रापूर येथील सिद्धार्थनगर येथे राहणाऱ्या दमयंती खुटे या आजी २७ नोव्हेंबर २०१९ रोजी एका दुकानात कामात होत्या. त्यावेळी लग्नपत्रिका देण्याच्या निमित्ताने दोन युवक तेेथे आले. आमच्या आजीला सोन्याच्या बांगड्या आणि बोरमाळ करायची आहे, असे म्हणून तुमची बोरमाळ कितीची आहे दाखवा, त्याचा फोटो काढतो, असे म्हणून आजीला बोरमाळ काढायला लावली. बोरमाळचे फोटो काढण्याच्या बहाण्याने बाजूला घेऊन जात आजीची सव्वा तोळे वजनाची सोन्याची बोरमाळ घेऊन पळाले होते. त्यानंतर आजीने पोलिसांत फिर्याद दिली होती. पोलिसांनी मोठ्या शिताफीने चोरांचा मागोवा काढला व संशयावरून काहींना ताब्यात घेतले व त्यांच्याकडील दागिने जप्त केले होते. न्यायालयाच्या आदेशाने आज आजींना दागिने परत देण्यात आले. पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी आजीकडे दागिने सुपूर्द केले. यावेळी सहायक पोलीस निरीक्षक विक्रम साळुंके, सहायक पोलीस उपनिरीक्षक जयप्रकाश चव्हाण, पोलीस हवालदार दत्तात्रय शिंदे, पोलीस नाईक प्रतीक जगताप यांसह आदी उपस्थित होते.

--

फोटो क्रमांक : १७ शिक्रापूर आजीचे दागिने

फोटो खालील ओळ – शिक्रापूर, ता. शिरूर येथे चोरीच्या गुन्ह्यातील दागिने आजीच्या स्वाधीन करताना पोलीस.(धनंजय गावडे)

Web Title: Twenty months later, the stolen grandmother's jewelry was recovered

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.