महाळुंगेत वीस वर्षानंतर सत्तांतराचा भूकंप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 04:14 AM2021-01-19T04:14:10+5:302021-01-19T04:14:10+5:30

खेड तालुक्यातील महाळुंगे ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. माघील पंचवार्षिक निवडणुकीत बिनविरोध झालेली निवडणूक यावेळी भलत्याच दिशेने ...

Twenty years after the earthquake in Mahalunga | महाळुंगेत वीस वर्षानंतर सत्तांतराचा भूकंप

महाळुंगेत वीस वर्षानंतर सत्तांतराचा भूकंप

Next

खेड तालुक्यातील महाळुंगे ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. माघील पंचवार्षिक निवडणुकीत बिनविरोध झालेली निवडणूक यावेळी भलत्याच दिशेने गेली. ग्रामपंचायत मधील सतरा जागे पैकी सहा जागा बिनविरोध झाल्या. तर या निवडणुकीत सद्गुरू पॅनेल ची सत्ता संपुष्टात आली. गेली वीस वर्षे एक हाती सत्ता असलेल्या ग्रुपला मोठं खिंडार पडल्याने पॅनेल मध्ये दोन ग्रुप पडले. वैयक्तिक वाद व सत्ता सातत्याने आपल्याकडेच हवी अश्या विचाराने सद्गुरू पॅनेल मध्ये दोन ग्रुप पडले. विरोधकांकडे उमेदवार नसताना सद्गुरू पॅनेल मधीलच कार्यकर्त्यांनी एकमेकांच्या विरोधात उभे राहून निवडणूक लढवली. महाळुंगे ग्रामपंचायत निवडणूक स्थानिक पातळीवर सद्गुरू पॅनेल ची प्रतिष्ठेची ठरली.

यावेळी समर्थ सद्गुरू पॅनेलने पाच जागा निवडून आणल्या गावात सर्व विजयी उमेदवारांचे ग्रामस्थांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष भेटून शुभेच्छा देत अभिनंदन केले.

विजयी उमेदवार पुढील प्रमाणे

प्रभाग १ - मेंगळे बेबी साजीस (अनु.ज. स्त्री) बिनविरोध, भोसले मंगल राजेंद्र (ना.मा.प्र स्त्री), मिंडे ऋषिकेश शामराव (सर्वसाधारण),

प्रभाग २- काळे पांडुरंग अशोक (अनु.जमाती) बिनविरोध, फलके नितीन तान्हाजी(ना.मा.प्र), जावळे वैशाली संतोष (सर्व.स्त्री). प्रभाग ३- इंगवले मनोहर चंद्रकांत (ना.मा.प्र)- महाळुंगकर मयुरी प्रताप (सर्व.स्त्री). प्रभाग ४- भालेराव पल्लवी केवल (अनु.जा.स्त्री) बिनविरोध. भालेराव किशोर विष्णू (अनु.जाती)बिनविरोध, तुपे शेखर अनिल (सर्वसाधारण)

प्रभाग ५, महाळुंगकर अर्चना मुकुंद (ना.मा.प्र स्त्री) बिनविरोध., महाळुंगकर वैशाली दिनकर (सर्व.स्त्री) बिनविरोध., महाळुंगकर विश्वनाथ तुकाराम (सर्वसाधारण). प्रभाग ६ - वाळके जयश्री अनिल ( ना.मा.प्र स्त्री)- भोसले दिपाली ज्ञानोबा (सर्व. स्त्री) महाळुंगकर लक्ष्मण धोंडिबा (सर्वसाधारण)

--

Web Title: Twenty years after the earthquake in Mahalunga

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.