वीस वर्षं एकत्र, आता फसवणुकीची तक्रार; ५४ वर्षांच्या नागरिकावर बलात्काराचा गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2022 09:43 AM2022-08-08T09:43:13+5:302022-08-08T09:46:32+5:30
कोथरूडमध्ये राहणाऱ्या ५० वर्षीय महिलेची चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद...
पुणे : गेली २० वर्षे ते एकत्र राहत होते. काही कारणावरून त्यांच्यात वाद झाले. त्यानंतर ते वेगळे राहू लागले. त्यानंतर आता लग्नाचे आमिष दाखवून आपल्याबरोबर जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवल्याची तक्रार महिलेने केली आहे.
याबाबत कोथरूडमध्ये राहणाऱ्या एका ५० वर्षीय महिलेने चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी सध्या कर्नाटकात राहणाऱ्या एका ५४ वर्षांच्या नागरिकावर बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार औंधमध्ये २००२ ते २६ मे २०२२ दरम्यान घडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
आरोपीने फिर्यादीस लग्नाचे आमिष दाखवून फिर्यादीसोबत जरबदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. फिर्यादीस मारहाण केली म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक पाटील तपास करीत आहेत.