सोमवारी कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या दुप्पट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:15 AM2021-05-05T04:15:16+5:302021-05-05T04:15:16+5:30
पुणे : शहरात सोमवारी दिवसभरात ४ हजार ४६ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, त्यातुलनेत रुग्णवाढही निम्म्याच्या आसपास आहे़ आज दिवसभरात ...
पुणे : शहरात सोमवारी दिवसभरात ४ हजार ४६ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, त्यातुलनेत रुग्णवाढही निम्म्याच्या आसपास आहे़ आज दिवसभरात १२ हजार २७६ जणांची तपासणी करण्यात आली असून, यापैकी २ हजार ५७९ जण कोरोनाबाधित आढळून आले आहे. तपासणीच्या तुलनेत कोरोनाबाधितांची टक्केवारी २१ टक्के आहे.
आज दिवसभरात शहरात ७९ जणांचा मृत्यू झाला असून, यापैकी १८ जण हे पुण्याबाहेरील आहेत. शहरातील आजचा मृत्यूदर हा १.६२ टक्के आहे.
पुणे महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील विविध रुग्णालयांमध्ये सध्या ६ हजार ७२१ कोरोनाबाधित रुग्ण हे ऑक्सिजनसह उपचार घेत असून, १ हजार ४११ रुग्ण हे गंभीर आहेत. शहरात आत्तापर्यंत २१ लाख ७५ हजार ३५० जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी ४ लाख ३० हजार २१० जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तर यापैकी ३ लाख ८२ हजार ५१८ कोरोनामुक्त झाले आहेत. शहरातील सक्रिय रुग्णसंख्या ही ४० हजार ७०१ इतकी आहेत. शहरात आजपर्यंत ६ हजार ९९१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
-----------