भरधाव टंँकरने दुचाकीला धडक दिल्याने जुळ्या बहिणींचा मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2023 05:22 AM2023-10-17T05:22:29+5:302023-10-17T05:23:00+5:30

विश्रांतवाडी चौकातील सिग्नल ते थांबले होते. सिग्नल सुरू झाल्यानंतर पाठीमागून भरधाव निघालेल्या टँकरने दुचाकीला पाठीमागून धडक दिली.

Twin sisters die after speeding tanker hits two-wheeler in pune | भरधाव टंँकरने दुचाकीला धडक दिल्याने जुळ्या बहिणींचा मृत्यू 

भरधाव टंँकरने दुचाकीला धडक दिल्याने जुळ्या बहिणींचा मृत्यू 

लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : इंधन वाहतूक करणाऱ्या भरधाव टंँकरने दुचाकीला धडक दिल्याने सहप्रवासी जुळ्या बहिणींचा मृत्यू झाला. ही दुर्देवी घटना विश्रांतवाडी चौकात सोमवारी घडली. अपघातात मुलींची आई गंभीर जखमी झाली आहे .जुळ्या मुलींचा मृत्यू झाल्यानंतर प्रत्यक्षदर्शींना अश्रृ अनावर झाले. नागरिकांनी टँकरचालकाला चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिले.

    साक्षी सतीशकुमार झा आणि श्रद्धा सतीशकुमार झा (वय ४ वर्ष) अशी मृत्युमुखी पडलेल्या जुळ्या मुलींची नावे आहेत. अपघातात त्यांची आई किरण सतीशकुमार झा (वय ३८, रा. संत तुकारामनगर, भोसरी) गंभीर जखमी झाल्या असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. याप्रकरणी टँकरचालक प्रमोदकुमार यादव याला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, झा कुटुंबीय मूळचे उत्तरप्रदेशातील आहे. सतीशकुमार पुण्यात नोकरी करत होते. सोमवारी ते येरवड्यातील शास्त्रीनगर परिसरातील एका रुग्णालयात गेले होते. दुपारी साडेचारच्या सुमारास दुचाकीस्वार सतीशकुमार, त्यांची पत्नी किरण, जुळ्या मुली साक्षी आणि श्रद्धा निघाले होते. विश्रांतवाडी चौकातून ते आळंदीकडे निघाले होते.

विश्रांतवाडी चौकातील सिग्नल ते थांबले होते. सिग्नल सुरू झाल्यानंतर पाठीमागून भरधाव निघालेल्या टँकरने दुचाकीला पाठीमागून धडक दिली. दुचाकीस्वार सतीशकुमार फेकले गेल्याने त्यांना किरकोळ दुखापत झाली. पत्नी किरण आणि दोन मुली टँकरच्या चाकाखाली सापडल्या. गंभीर जखमी झालेल्या तिघींना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच दोघींचा मृत्यू झाला होता.

Web Title: Twin sisters die after speeding tanker hits two-wheeler in pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात