डिंभे धरणातून २० पासून आवर्तन
By admin | Published: April 11, 2015 05:12 AM2015-04-11T05:12:27+5:302015-04-11T05:12:27+5:30
डिंंभे धरणातून उजव्या कालव्याला सोमवारी (दि. २०) पाणी सोडण्याचा निर्णय आज घेण्यात आला. कुकडी प्रकल्पातील उन्हाळी पाणी आवर्तनाच्या नियोजनाची
मंचर : डिंंभे धरणातून उजव्या कालव्याला सोमवारी (दि. २०) पाणी सोडण्याचा निर्णय आज घेण्यात आला. कुकडी प्रकल्पातील उन्हाळी पाणी आवर्तनाच्या नियोजनाची बैठक विधानभवनात जलसंपदामंत्री विजय शिवतारे यांच्या अध्यक्षतेखाली झाली.
या वेळी गृहराज्यमंत्री राम शिंंदे, विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील, पारनेरचे आमदार विजय औटी, जुन्नरचे आमदार शरद सोनवणे, श्रीगोंद्याचे आमदार राहुल जगताप, भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष देवदत्त निकम, मुख्य अभियंता के. एम. शाह, अधीक्षक अभियंता किरण कुलकर्णी, कुकडी प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता जी. बी. नान्नोर उपस्थित होते.
या बैठकीत, येडगाव धरणातून डाव्या कालव्याला पाणी सोडण्यात येणार आहे. पिंंपळगाव जोगा कालवा, मीना शाखा कालवा, घोडशाखा कालवा यांना तातडीने पाणी सोडण्यात येणार आहे.
येडगाव धरणात पुरेसे पाणी उपलब्ध झाल्यानंतर १ मेपासून कुकडी डाव्या कालव्याला पाणी सोडण्यात येणार आहे. पिंंपळगाव जोगा कालव्यातून तातडीने पाणी आवर्तन सोडण्याचा निर्णय झाला. तसेच कुकडी डावा कालव्याला आवर्तन अखंडीत राहण्यासाठी आवश्यक पाणी पिंंपळगाव जोगे धरणातून येडगाव धरणात घेण्यात यावे, असे ठरले. (वार्ताहर)