खोरोची येथे २७ किलो गांजाची दोन झाडे जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:08 AM2021-06-30T04:08:30+5:302021-06-30T04:08:30+5:30
संतोष विठ्ठल साखरे रा. खोरोची (साखरे वस्ती) ता. इंदापूर, जि. पुणे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत ...
संतोष विठ्ठल साखरे रा. खोरोची (साखरे वस्ती) ता. इंदापूर, जि. पुणे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत पो.काँ.सिताराम रामा रामण्णा गुरव यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादीत म्हटले आहे की, मौजे खोरोची गावचे हद्दीतील साखरे वस्ती येथील शेतकरी संतोष साखरे याने त्याची शेतजमीन गट नं ४४८ मध्ये ऊस पिकाची लागवड केली आहे. आर्थिक फायद्यासाठी ऊस पिकामध्ये गांजाची दोन झाडे लागवड करून ती सहा ते सात फुटापर्यंत जोपासल्याचे दिसुन आले आहे.
सोमवार दिनांक २८ जून २०२१ रोजी १:३० वा.चे सुमारास पोलिसांनी ही घटना उघडकीस आणली आहे. पोलिसांना घटनास्थळी २७ किलो वजनाची गांजाची दोन झाडे ऊस पिकात लावलेल्या स्थितीत आढळून आली असून त्यांची किंमत १ लाख ८ इतकी असल्याचे म्हटले आहे. आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गांजाची शेतातील झाडे उपटून मुद्देमाल जप्त करण्यात आला. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक बीराप्पा लातुरे हे करत आहेत.
इंदापूर तालुक्यातील खोरोची येथील ऊस पिकात लावलेली गांजाची झाडे जप्तीची कारवाई करताना आरोपी सोबत स.पो.नि. बीराप्पा लातुरे व इतर.