कानसकर याच्या दोन साथीदारांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 04:31 AM2021-02-20T04:31:55+5:302021-02-20T04:31:55+5:30
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माहिती अधिकार कार्यकर्ता हरीश कानसकर व त्याच्या सहकाऱ्यांनी मंचर पोलीस ठाणे हद्दीतील व्यावसायिक, व्यापारी, शेतकरी हॉटेल ...
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माहिती अधिकार कार्यकर्ता हरीश कानसकर व त्याच्या सहकाऱ्यांनी मंचर पोलीस ठाणे हद्दीतील व्यावसायिक, व्यापारी, शेतकरी हॉटेल व्यावसायिक यांच्याकडे मी आरटीआय कार्यकर्ता असून माझ्याकडे विशेष पोलीस अधिकारी हे ओळखपत्र आहे.असे सांगून धमकावून पैशाची मागणी केल्याबाबत मागील दहा ते पंधरा दिवसांत कानसकर व त्याच्या सहकाऱ्यांवर खंडणीचे गुन्हे दाखल झाले आहेत.याप्रकरणी कानसकर व त्याच्या सहकाऱ्यांचा मंचर पोलीस कसून शोध घेत आहेत. काल सागर संतोष वाघ (रा. थोरांदळे, ता. आंबेगाव), प्रीतम हनुमंत भालेराव (रा. मंचर, ता. आंबेगाव) यांना मंचर पोलिसांनी अटक केली. सदर आरोपी पोलीस कस्टडीमध्ये आहेत. इतर आरोपी फरार आहेत. याबाबत मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधाकर कोरे यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की खंडणीच्या गुन्ह्यातील मुख्य आरोपी हरीश महादू कानसकर (रा. रांजणी, ता. आंबेगाव) हा नकलाकार असून तो महिलांची वेशभूषा करून पोलिसांना गुंगारा देत आहे.