पक्ष्यांसाठी खुली केली दोन एकर ज्वारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 04:11 AM2021-01-22T04:11:14+5:302021-01-22T04:11:14+5:30
शेतकऱ्यांच्या मालाचा बाजारभावाबाबत प्रश्न, विजेचा प्रश्न, शेतमालाचे उत्पादन होईल का यांची चिंंता, दुष्काळ, रोग, अवकाळी अशा विविध प्रश्नांनी वेढलेला ...
शेतकऱ्यांच्या मालाचा बाजारभावाबाबत प्रश्न, विजेचा प्रश्न, शेतमालाचे उत्पादन होईल का यांची चिंंता, दुष्काळ, रोग, अवकाळी अशा विविध प्रश्नांनी वेढलेला आहे. उत्पादनाची पर्वा न करता नुकसान होईल यांची काळजी न करता पिंपरी पेंढार येथील नितिन लक्ष्मण शेलार या शेतकऱ्यांने चक्क दोन एकर ज्वारी पक्ष्यांसाठी राखून ठेवली आहे. ही ज्वारी न काढता तशीच शेतात उभी आहे. या लखलखत्या उन्हामध्ये माणसाला नकोसे झाले आहे. यामुळे या पक्ष्यांचा अन्नासाठी व पाण्यासाठी वणवण थांबणार आहे.
शेतकरी नितीन शेलार म्हणाले की, सध्या उष्णतेचे प्रमाण तीव्र असून माणसाला या उष्णतेने असहाय झाले आहे तर या पक्ष्यांचे काय, असा क्षणभर विचार आला. त्यामुळे आम्ही हा निर्णय घेतला आहे. तसेच प्रत्येक जण स्वत:चा विचार करत आहे. कोणीही या प्राण्यांचा व पक्ष्यांचा विचार करत नाही. मात्र सर्वांनी थोडा का होईना मुक्या प्राणी, पक्ष्यांचा विचार केला पाहिजे.
--
फोटो क्रमांक : २१ पिंपरी पेंढार नितीन शेलार
फोटो- पिंपरी पेंढार येथील नितिन शेलार यांनी पक्ष्यांसाठी सोडली दोन एकर ज्वारी.